भाविकांच्या महाप्रसादासाठी ताटे व वाट्या गांवकर मंडळींकडे केल्या सुपूर्द
मालवण | प्रतिनिधी : आपल्या सामाजिक कार्याने कार्यसम्राट हा बहुमान जनतेतुन प्राप्त केलेले मालवण नगरीचे माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी कुंभारमाठ येथील श्री देवी जरीमरी मंदिर येथे महाप्रसादासाठी आवश्यक असणारी ताटे व वाट्या सेवा स्वरूपात अर्पण केल्या आहेत. नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने गांवकर मंडळींकडे ताट वाट्या सुपूर्द करण्यात आल्या.
यावेळी माजी नगरसेवक जगदीश गावकर, रवी मालवणकर, खरेदी विक्री संचालक आबा हडकर, युवामोर्चा शहरअध्यक्ष ललित चव्हाण, प्रवीण गावकर, बाबू गावकर, अशोक गांवकर, कमलाकर गावकर, सुहास गावकर, महादेव गावकर, विलास गावकर, राजन गावकर, प्रमोद गावकर, मंदार गावकर, मयूर कदम, महिला अध्यक्ष जरीमरी- वैभवी गावकर, प्रभा गावकर, जुई गांवकर, दिपाली गावकर, सरिता गावकर, हेमा गावकर, सुजा गावकर, पूजा गावकर, स्मिता गावकर, राजश्री गावकर, मानसी गावकर यांसह गावकर परिवार यावेळी उपस्थित होते.

