शिवसन्मान यात्रेचे आयोजन ; बंदरजेटी येथे व्याख्यान
मालवण : राजकोट किल्ला येथील शिवपुतळा कोसळण्याच्या प्रकरणामुळे शिवप्रेमी मधून नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर दिशादर्शक मार्गदर्शन करण्यासाठी शिवव्याख्याते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांचे व्याख्यान ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता बंदरजेटी या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे.
तरी जास्तीत जास्त शिवप्रेमींनी यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहन ज्येष्ठ शिवसैनिक नितीन वाळके यांनी केले आहे.
शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत श्री. वाळके बोलत होते. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, युवा सेना तालूका प्रमुख मंदार ओरसकर, उपशहप्रमुख बंड्या सरमळकर तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शिवव्याख्याने पाटील यांचे कुंभारमाठ याठिकाणी भव्य स्वागत शिवसेनेच्यावतीने करण्यात येणार आहे. त्याठिकाणी शिवपुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर मोटारसायकल रॅलीने बंदरजेटी याठिकाणी त्यांचे आगमन होणार आहे. शिवप्रेमींच्या उत्स्फूर्त गर्दीमध्ये त्यांचे विचार एकण्यात येणार आहेत. शिवपुतळा दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर पाटील हे मालवणमध्ये येण्याचे निश्चीत झाले होते. त्यानुसार त्यांचा दौरा ६ ऑक्टोबरला निश्चीत झालेला आहे, असेही श्री. वाळके म्हणाले.
शिवसन्मान यात्रा चालूच राहणार
शिवपुतळा दुर्घटनेतील दोषींवर कारवाई होण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या शिवसन्मान यात्रेतून निषेध मोर्चा, जाहीर सभा असे कार्यक्रम घेण्यात आलेले आहेत. आता शिवव्याख्याते पाटील यांचे मार्गदर्शन झाल्यानंतर पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे. पाटील यांनी शुभराजे या महानाट्याची निर्मिती केलेली आहे. त्यांनी रौद्र ही शंभुराजेंवर काबंदरी लिहिलेली आहे. यशाचा पास्टवर्ड यासारखी पुस्तके लिहिलेली आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही लढण्यासाठी सज्ज राहणार आहोत, असेही श्री. वाळके म्हणाले.

