मालवण : मालवण तालुका धान्य दुकानदार संघटनेच्यावतीने नुकतीच बदली होऊन देवगड येथे गेलेले, सर्व दुकानदारांना आदरपूर्वक प्रेम भावनेने वागणूक देऊन आपल्या सेवेच्या अल्पकाळामध्ये सर्व रेशन दुकानदारांच्या हृदयामध्ये स्थान निर्माण केलेले मालवण पुरवठा निरीक्षक (Sak) इब्राहिम तडवी यांचा सन्मान सोहळा संपन्न झाला.

या सन्मान सोहळ्याप्रसंगी मालवण तालुका धान्य व केरोसीन संघटनेचे अध्यक्ष अमित गावडे,उपाध्यक्ष बाळकृष्ण लुडबे,सचिव सुभाष गिरकर, संघटनेचे मार्गदर्शक माजी अध्यक्ष सुहास हडकर, सिंधुदुर्ग जिल्हा रेशन दुकानदार संघटनेचे सल्लागार कमलाकांत कुबल, विलास पांजरी, गणेश सावंत, द्वारकानाथ पालव,विलास धुरी, विशाल ढोलम, अमित प्रभुदेसाई, दत्ता टक्के, दादा मांजरेकर,सचिन कांडरकर, पराग आचरेकर , बाळा केळुस्कर,योगेश जाधव,रोहित पेडणेकर, सत्यविजय ढोलम,सुनील पालव, नंदकुमार सावंत, बबन परब, हनुमंत दळवी, दादा कुशे, श्रेया चव्हाण, तुषार मालवणकर, खुशी मलये यांच्यासह असंख्य दुकानदार उपस्थित होते.

