Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

मालवण | मातृत्व आधार फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना दप्तर वाटप

मालवण | मातृत्व आधार फाउंडेशनच्या वतीने  विद्यार्थ्यांना दप्तर वाटप

मालवण | प्रतिनिधी : पाच वर्षांपूर्वी समाजहिताच्या दृष्टिकोनातून मालवणात स्थापन झालेल्या मातृत्व आधार फाउंडेशनने निरपेक्ष बुद्धीने सामाजिक, वैद्यकीय, शैक्षणिक उपक्रम राबवितानाच गोरगरीब, दिन दलितांचे अश्रू पुसण्याचा आपल्या परीने प्रयत्न केला. शिक्षण क्षेत्रात तर गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना मदत करण्याच्या दृष्टीने अनेक उपक्रम राबविले. यापुढेही सामाजिक जाणीवेतून मातृत्व आधार फाउंडेशन अशाच पद्धतीने उपक्रम राबविल, असे प्रतिपादन मातृत्व आधार फाउंडेशनचे संस्थापक संतोष लुडबे यांनी येथे बोलताना केले.

मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कुल येथे मातृत्व आधार फाउंडेशनच्या वतीने दप्तर वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यावेळी व्यासपीठावर मातृत्व आधार फाउंडेशनचे अध्यक्ष महेश कांदळगावकर, बिर्ला कंपनीचे सेवानिवृत्त सुपरवायझर रमाकांत पाटकर, सौ. सुहासिनी पाटकर, मुख्याध्यापक एच. बी. तिवले, मातृत्व आधार फाउंडेशनचे संचालक दादा वेंगुर्लेकर, सोनाली पाटकर, टोपीवाला हायस्कुलच्या शिक्षिका ज्योती तोरसकर, ऋत्विक सामंत, किसन मांजरेकर, पर्यवेक्षक आर डी. बनसोडे आदी उपस्थित होते.

प्रारंभी मुख्याध्यापक श्री. तिवले यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी रमाकांत पाटकर यांच्या आर्थिक योगदानातून विद्यार्थ्यांना दप्तर वाटप करण्यात आले. यावेळी महेश कांदळगावकर, दादा वेंगुर्लेकर यांची समायोचित भाषणे झाली. शेवटी आर. डी. बनसोडे यांनी आभार मानले.

ruchira top