मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट अभियान अंतर्गत शासकीय योजनांची दिली माहिती
मालवण | प्रतिनिधी : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण कुटूंब भेट अभियाना अंतर्गत सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी युवासेना पदाधिकाऱ्यांनी गावागावात जाऊन योजना मार्गदर्शन आयोजित केले. याचा शुभारंभ मालवण येथे करण्यात आला.
"मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" कुटुंब भेट अभियान अंतर्गत युवासेना जिल्हाप्रमुख ऋत्विक सामंत, युवतीसेना जिल्हाप्रमुख सौ. सोनाली पाटकर आणि युवासेनेचे माध्यमातून हा कार्यक्रम करण्यात आला या वेळी शिवसेना - युवासेना पदाधिकारी यांनी गावांतील महिला भगिनींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, लेक लाडकी लखपती योजना, मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना, मुलींसाठी मोफत उच्चशिक्षण योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, मुख्यमंत्री कृषीपंप वीज बिल माफ योजना, कामगार कल्याण योजना, महिला बचत गटासाठी विविध योजना अशा महायुती सरकारच्या विविध योजनांच्या बाबतीत सिंधुदुर्ग जिल्हा प्रवक्ते आशिष नाबर यांच्या माध्यमातून माहीती देवून मार्गदर्शन केले.
यावेळी शिवसेना मा. जिल्हा सचिव किसन मांजरेकर, युवा उद्योजक प्रीतम गावडे, युवासेना तालुकाप्रमुख अभिषेक कांदळगावकर, ओमकार चव्हाण, तथागत मालवणकर, लौकिक मेथर, प्रतीक गावडे, शितल पेडणेकर, सोनल मुळेकर यांसह महिला भगिनी उपस्थित होते.

