मालवण | प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी गोमातेला "राज्यमाता - गोमाता" घोषित करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाने, युवासेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख ऋत्विक सामंत, युवतीसेना जिल्हाप्रमुख सौ. सोनाली पाटकर यांनी मालवण तालुक्यात गावागावत जाऊन गोमातेचे पूजन केले. श्री. मंगेश चव्हाण, श्री. नेरकर यांच्या घरी गोमातांचे पूजन करण्यात आले.
यावेळी शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा प्रवक्ते आशिष नाबर, मा. जिल्हा सचिव किसन मांजरेकर, युवा उद्योजक प्रीतम गावडे, युवासेना तालुका प्रमुख अभिषेक कांदळगावकर, ओंकार चव्हाण, तथागत मालवणकर, लौकिक मेथर, प्रतिक गावडे, शितल पेडणेकर, सौ. सोनल मुळेकर यांसह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

