Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

विमा प्रतिनिधी वैशाली गावकर ठरल्या एलआयसी मालवण ब्रांच मधील पहिल्या शतकवीर

विमा प्रतिनिधी वैशाली गावकर ठरल्या एलआयसी मालवण ब्रांच मधील पहिल्या शतकवीर

अवघ्या सहा महिन्यात शतक पुर्ण : मालवणच्या ब्रांच मध्ये करण्यात आला सन्मान

मालवण | प्रतिनिधी : एलआयसी ऑफ इंडिया मालवण शाखेत 2024-2025 या वर्षात सर्वात पहिलं शतक झळकावण्याचा मान मालवणच्या वैशाली विकास गावकर यांना मिळाला आहे. त्यांचे मालवणच्या ब्रांच मध्ये एलआयसी कोल्हापूर विभाग सिनियर डीव्हीजनल मॅनेजर श्री. विवेक देशमुख साहेब यांच्या हस्ते तसेच सेल्स मॅनेजर श्री. गजानन कोषटवार साहेब, मालवण ब्रांच मॅनेजर सतेजा बोवलेकर मॅडम यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

वैशाली गावकर या मालवण ब्रांच मध्ये विमा प्रतिनिधी म्हणून गेली 21 वर्षे कार्यरत आहेत. त्यांनी गेल्या 21 वर्षात एलआयसी शाखेमध्ये विविध सन्मान मिळवले आहेत. एलआयसीचा 'वन डे वंडर' हा किताबही त्यांनी मिळवला आहे. 2024- 25 या आर्थिक वर्षात वैशाली गावकर यांनी शंभर पॉलिसी 25 सप्टेंबर 2024 रोजी पूर्ण करून त्यांनी पहिला शतकवीर होण्याचा मान मिळवला आहे. त्यांनी सध्या 121 नवे विमा प्रस्ताव एलआयसी ब्रांच मध्ये सादर केले आहेत. खर तर शतकवीर हा एलआयसीतील मोठा सन्मान मानला जातो. एक वर्षात शतक बनवणं हा प्रत्येक विमा प्रतिनिधींचा प्रयत्न असतो. वैशाली गावकर यांनी मात्र अवघ्या 6 महिन्यात शतक बनवल आहे. या वर्षात द्विशतकवीर होण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आगामी काळात एलआयसीच्या नव-नवीन योजना येणार आहेत. यासाठी आपण प्रस्ताव सादर करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. शंभर प्रस्ताव सादर करण्यासाठी मालवणचे ब्रांच मॅनेजर सतेजा बोवलेकर, एलआयसी टीम मालवण, तसेच विमाधारक यांचं सहकार्य खूप मोलाचं ठरलं आहे त्यांच्या सहकार्यामुळेच एवढा पल्ला गाठू शकले अशी प्रतिक्रिया वैशाली गावकर यांनी व्यक्त केली आहे.

ruchira top