Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

मसुरेतील प्रसिद्ध क्रिकेटपटू सुनील दूखंडे यांचे निधन

मसुरेतील प्रसिद्ध क्रिकेटपटू सुनील दूखंडे यांचे निधन

मसुरे | प्रतिनिधी : मसुरे मागवणे येथील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध क्रिकेटपटू सुनील सिताराम दूखंडे वय ४४ वर्ष याचे नुकतेच मुंबई येथे आकस्मिक निधन झाले. सुनील याच्या निधनाने मसुरे परिसरात हळ हळ व्यक्त होत आहे.


सुनील दूखंडे याचे सिंधुदुर्गच्या टेनिस क्रिकेटमध्ये मोठे योगदान होते. सिक्सर किंग म्हणून टेनिस क्रिकेटमध्ये त्याची ओळख होती. मसुरे गावातून मागवणे संघाकडून श्री गणेशा करणाऱ्या सुनील याने पुढे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गूड मॉर्निंग मालवण, गजानन गावा, एम एस ए मसुरे, स्टार इलेव्हन मसुरे, एमसीसी मागवणे, संडे स्पोर्ट्स मुंबई,पनवेल संघ, बंड्या इलेव्हन मसुरे, देवबाग संघ, देवगड, कुडाळ, कणकवली, सावंतवाडी अशा नामवंत संघामध्ये सुनील याची निवड झाली होती. तसेच महाराष्ट्र बाहेरील गोवा येथील अनेक नामवंत संघामध्ये सुनील याने आपल्या खेळाची चुणूक दाखवली होती. मसुरे येथे सामाजिक, कला, क्रीडा तसेच धार्मिक क्षेत्रातही त्याचा मोठा वाटा होता.

अनेक युवा क्रिकेटपटू घडविण्यातही सुनील याचे योगदान मोठे होते. आपल्या शांत आणि मैत्रीपूर्ण स्वभावामुळे सर्वांशी त्याचे सलोख्याचे संबंध होते. वेळप्रसंगी सर्वांच्या मदतीला धावून जाण्याचा त्याचा गुणधर्म होता.


त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, वडील, दोन बहिणी,काका,काकी, भावोजी सासू-सासरे,चुलत भाऊ असा मोठा परिवार आहे. मसुरे येतील युवा सामाजिक कार्यकर्ते महेश वंजारे यांचे तो मेहुणा, मागवणे येथील आशा स्वयंसेविका मीना वंजारे याचा तो भाऊ तर मुंबई मालाड येथील भारतीय जनता पक्षाचे युवा नेते सुरेश मापारी यांचा तो मामेभाऊ, मागवणे नूतन पोलीस पाटील अभी दूखंडे यांचा तो चुलत भाऊ होता.

ruchira top