Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

विद्यार्थ्यांनी अनुभवली लोकशाही निवडणूक प्रक्रिया

विद्यार्थ्यांनी अनुभवली लोकशाही निवडणूक प्रक्रिया

कुडाळ हायस्कुलमध्ये पार पडली स्वराज्य सभा निवडणूक

मुलांमध्ये प्रचंड कुतूहल आणि उत्साह

मयूरेश भोगटेने स्वराज्य सभेचा नवनिर्वाचित मुख्यमंत्री

कुडाळ : विद्यार्थ्यांना लोकशाहीतील मतदानाची प्रक्रिया समजावी या हेतूने शाळांमधून शालेय स्वराज्यसभा निवडणुका घेतल्या जातात. सोमवारी कुडाळ हायस्कूल कुडाळमध्ये ही मतदान प्रक्रिया पार पडली. यामध्ये मुख्यमंत्री म्हणून मयुरेश बापू भोगटे यांची निवड झाली आहे.त्याच्या सोबतच स्वराज्य सभेत निवडणून आलेल्या इतर उमेदवाराचे मंत्रिमंडळ शालेय कामकाजात सहभागी होणार आहे.
लोकशाहीमध्ये ज्या पद्धतीने निवडणुका घेतल्या जातात त्या प्रमाणेच या निवडणुकीत मतदान प्रक्रिया पार पडली. मुख्यमंत्री पदासाठी दहावीतील उमेदवार, उपमुख्यमंत्री, क्रीडामंत्री आणि शिस्तमंत्री पदासाठी 9वीतील उमेदवार, सांस्कृतिक मंत्रीसाठी आठवी, विद्यर्थिनी प्रतिनिधी साठी आठवी ते दहावीतील उमेदवार, तर आरोग्य मंत्री, वाचनालय आणि स्वच्छतामंत्री साठी अनुक्रमे सातवी, सहावी आणि पाचवीतील उमेदवार निवडणूक रिंगणात होते. मुख्यमंत्री पदासाठी 6, उपमुख्यमंत्री पदासाठी 2, क्रीडा मंत्री साठी 4, शिस्तमंत्री साठी 2, सांस्कृतिक साठी 6, विद्यार्थ्यांनी प्रतिनिधी साठी 6, आरोग्यमंत्री साठी 2, वाचनालय मंत्री साठी 2 आणि स्वच्छतामंत्रीसाठी 3 असे एकूण ३३ आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे १३ असे एकूण मिळून ४६ उमेदवार निवडणूक रिंगणात होते.
.कनिष्ठ महाविद्यलयाची निवडणूक अगोदर झाली. त्यात अकरावी आणि बारावी च्या प्रत्येकी ८ वर्गातून मंत्रिमंडळ निवडण्यात आले. यामध्ये मुख्यमंत्री म्हणून पूजा मोतीराम पडते (बारावी आर्टस्), उपमुख्यामंत्री हर्ष संतोष नाईक (बारावी सायन्स), आरोग्य आणि स्वच्छता मंत्री कौस्तुभ दत्ताराम कुबल (बारावी कॉमर्स), क्रीडा मंत्री प्रल्हाद वासुदेव शेलटे (अकरावी कॉमर्स), शिक्षण आणि शिस्त मंत्री जिनान अब्दुल रहीम काझी (अकरावी सायन्स), अन सांस्कृतिक मंत्री कशीष दत्तप्रसाद खडपकर (बारावी आर्टस्) यांनी निवड झाली आहे. यासाठी ज्युनियर कॉलेजचे उपमुख्याध्यापक प्रा. पी. बी. कदम, सहाय्य्क शिक्षक एन के साळवे आणि सहाय्यक शिक्षक ए एम परीट यांनी काम पाहिलं.
इयत्ता ५ ते ७ वि साठी बॅलेट पेपर म्हणजेच मतपत्रिकेद्वारे मतदान करण्यात आले. . त्यासाठी एका वर्गामध्ये मतदान केंद्र उभारण्यात आले होते. . मुलं रांगेत येऊन मतपत्रिकेवर आपल्या पसंतीच्या उमेदवराला मत देऊन ती मतपत्रिका मतपेटीत टाकत होती. आरोग्य मंत्री, वाचनालय आणि स्वच्छतामंत्री साठी अनुक्रमे सातवी, सहावी आणि पाचवीतील उमेदवार निवडणूक रिंगणात होते.
इयत्ता ८ वि ते दहावी साठी मात्र व्हीवी अँप द्वारे मतदान प्रक्रिया घेण्यात आली. प्रत्येक मंत्रिपदासाठी स्वतन्र टेबलची व्यवस्था करण्यात आली होती. मतदान कक्षाबाहेर मोठ्या रांगाच रांगा लागल्या होत्या. विद्यार्ह्त्यांमध्ये कमालीचा उत्साह होता. रजिस्टर वर नाव लिहून बोटाला शाही लावून नन्तर विवि अँप मध्ये पसंतीच्या उमेद्वारासमोरच बटण दाबून मतदान केलं जात होत. विद्यार्थी यासाठी कमालीचे उत्सुक होते.
स्वराज्य सभेच्या निवडणुकीला विद्यार्थी मतदारांचा चांगलाच प्रतिसाद मिळला. एकूण १ हजार २०६ विद्यार्थ्यांपैकी १ हजार २ विद्याथ्यांनी मतदान प्रक्रियेत भाग घेतला. मतदानाची एकूण टक्केवारी ८३.०८ टक्के एवढी झाली. या निवडणुकीत मुख्यमंत्री - मयुरेश बापू भोगटे, उप मुख्यमंत्री कु. प्रीती कोंडस्कर, क्रीडा मंत्री कु. केतकी ठाकूर, शिस्त मंत्री वेदांत साळवणकर, सांस्कृतिक मंत्री कु. आर्या वारंग, विद्यार्थिनी प्रतिनिधी कु. श्रावणी आरवंदेकर, आरोग्य मंत्री पार्थ वझे, वाचनालय मंत्री आराध्य सावंत, स्वच्छता मंत्री कु. ओवी शिरसाट हे निवडून आले.
या स्वराज्य सभा निवडणुकीसाठी ४५ एनसीसी कॅडेटसनी निखिल ओरोसकर यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले. या मतदान प्रक्रियेसाठी मुख्याध्यापक दिनेश आजगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली योगानंद सामंत, दत्तात्रय शिंगाडे, सुशीलकुमार कडुलकर, सौ. एस.के. परब, सौ. जे. डी. ठाकूर, गुरुप्रसाद शिरसाट, रामचंद्र खाकर, नवसू दरवडा, सुजित गंगावणे, एस.पी. गोसावी, निखिल ओरोसकर, बाळकृष्ण तुळसकर, ए. ए. पोवार, राजाराम तोरसकर, विजय मयेकर, ए. ए. पोटे यांनी काम पहिले. तर मतमोजणी अधिकारी म्हणून सौ. सुवर्णा नवार, सौ. मनीषा कुबल, सौ. राधा शिरसाट, सौ. शिवानी ठाकूर, श्रीम. नेहा कांदळगावकर, सौ. प्राजक्ता ठाकूर, सौ. प्रियांका पोटे, सौ. गंगा वैद्य, सौ. स्नेहल आंबेकर, शौ. शलाका गंगावणे यांनी काम पहिले.

ruchira top