Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

आंगणेवाडी वर एसटी महामंडळाचा अन्याय…

आंगणेवाडी वर एसटी महामंडळाचा अन्याय…

देवगड आंगणेवाडी एसटी अनियमित..

मसुरे | प्रतिनिधी : पालकमंत्री रवींद्र चव्हाण तसेच तत्कालीन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या आदेशानंतर विभाग नियंत्रक श्री अभिजीत पाटील यांनी देवगड आंगणेवाडी मालवण व्हाया आचरे त्रिंबक मसुरे बांदीवडे आंगणेवडी मालवण ही गाडी सुरू केली . परंतु देवगड एसटी डेपो मॅनेजर यांनी सदर गाडी काही दिवसातच पुन्हा बंद केली. परंतु पुन्हा एकदा आंगणेवाडी विकास मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी लेखी निवेदन व प्रत्यक्ष भेट घेऊन सदरची एसटी पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले असता सदरची एसटी विजयदुर्ग आंगणेवाडी अशी सुरू केली परंतु सद्यस्थितीत ही गाडी कधी येते कधी येत नाही हे कोणालाच कळत नाही. काही वेळेला ही एसटी दुसऱ्याच मार्गाने जाते. त्यामुळे प्रवासी,ग्रामस्थ , आंगणेवाडी येथील भराडी देवी भक्तांच्या भाविकांचे अतोनात हाल होत आहेत काही वेळा ही एसटी नियोजित बस थांबल्यावर ही थांबत नाही.
महाराष्ट्रामध्ये आंगणेवाडी येथे श्रीदेवी भराडी देवी मातेचे प्रसिद्ध असे मंदिर असून दरदिवशी हजारो भाविक या मंदिराला भेट देत असतात आणि म्हणूनच या एसटीची मागणी भराडी मातेच्या भक्तांमधून आणि ग्रामस्थांमधून होत होती. येथील प्रसिद्ध यात्रा उत्सवामध्ये एसटी महामंडळाला येथील ग्रामस्थ आणि मंडळ आपल्या जागा विना मोबदल्या उपलब्ध करून नेहमी सहकार्य करत असतात. परंतु देवगड एसटी आगर आणि संबंधित सर्व एसटी अधिकारी वर्गाच्या गलथान कारभारामुळे सदरची एसटी अनियमित तर कधी कधी येतच नसल्यामुळे आंगणेवाडी वरती हा एक प्रकारचा अन्याय असून सदर एसटी कायमस्वरूपी न केल्यास येथील ग्रामस्थ आंदोलन छेडणार असून याबाबत पुन्हा एकदा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे लक्ष वेधणार आहेत अशी माहिती आंगणेवाडी येथील ग्रामस्थ सिताराम उर्फ बाळा आंगणे यांनी दिली.

ruchira top