Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

कुडाळात खड्ड्यात गेले रस्ते !

कुडाळात खड्ड्यात गेले रस्ते !

ठेकेदारांवर कारवाई करण्याची संजय भोगटे यांची मागणी

निलेश जोशी | कुडाळ : शहरातील रस्त्यांवर खड्डेच खड्डे सध्या दिसत आहेत. त्यामुळे वाहनचालक आणि नागरिक त्रस्त झाले आहेत. या रस्त्याच्या संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय भोगटे यांनी केली आहे. त्या बाबतचे पत्रच त्यांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी याना पाठविले आहे.
  याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात संजय भोगटे म्हणतात, कुडाळ नगर पंचायत अखत्यारीतील अनेक रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. पडत आहेत.  वर्षातून एकदाच येणाऱ्या गणेश चतुर्थीच्या सणाला रस्ते खड्डे मुक्त राहावेत ही अपेक्षा होती. तसे जिल्हाधिकारी आणि नगर पंचायत मिटींगच्या वेळीं ठरलेले होते. परंतु हि अपेक्षा फोल ठरली. अनेक ठिकाणी खड्डे पडले, ते पुन्हा भरले, ते खड्डे पुन्हा उखडले. परंतु पडलेले खड्डे नगर पंचायत व्यवस्थित दुरुस्त करू शकली नाही हे दुर्दैव आहे.
    हॉटेल गुलमोहर ते भंगसाळ नदीकडे जाणारा अंदाजे फक्त १०० मीटरचा रस्ता दुरुस्त होऊ शकला नाही. त्या रस्त्याला कित्येक वर्ष झाली परंतु तो रस्ता मजबूत व डांबरीकरण केल्याचे दिसुन आलेले नाही. गणेश चतुर्थी सूरू झाल्यानंतर न.प. ला रस्त्याची आठवण झाली. अस नियोजन असतं का? असा सवाल श्री. भोगटे यांनी केला तेच.
    भंगसाळ नदीवरील गणेश घाटाच्या पायऱ्या नदीच्या पाण्याच्या पात्रापर्यंत बांधलेल्या आहेत. परंतु त्या खालच्या पायऱ्या मातीने, गाळाने भरलेल्या आहेत.  त्या पायऱ्या साफ करून घेणे गरजेचे होते. परंतू त्या तशाच ठेवल्या गेल्या. तसेच बोभाटे दुकान पानबाजार, मच्छी मार्केट कॉर्नर पासून ते हॉटेल गुलमोहोर पर्यंतच्या स्ट्रीट लाईट काहीं बंद होत्या तर काही लाईट एका बाजूने लावलेल्या आहेत त्यामुळे त्याठिकाणी  काळोख होता.
    शहरात काहीं ठिकाणीं पाणी वाहून न जाणारा गटार बांधला गेला, परंतु ह्या ठिकाणीं अत्यंत आवश्यक असणारा रस्ता नगर पंचायत गेली कित्येक वर्ष का बांधू शकली नाही? खर तर नगर पंचायत कार्यालयाकडे स्वतंत्र बांधकाम विभाग आहे.  त्या मार्फत सर्वे करून आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे असताना त्याकडे दुर्लक्ष का?
     शहरातील अनेक ठिकाणी पडलेले खड्डे पावसाळ्यापूर्वी भरणे आवश्यक होते, परंतू ते खड्डे पाऊस सुरू झाल्यानंतर भरले गेले त्यामुळे अनेक ठिकाणीं भरलेल्या खड्ढे पुन्हा उखडले. याला पूर्णपणे ठेकेदार जबाबदार आहे. हे माहित असून त्या ठेकेदारावर तुमची मेहेरबानी का? ठेकेदाराने आपल्याला वेळ मिळाला तेव्हा खड्डे बुजविले,  हा काय प्रकार? तशी अट होती काय? असे सवाल श्री. भोगटे यांनी उपस्थित केले आहेत.
   पोलिस स्टेशन कॉर्नर ला MNGL ची गॅस पाईप लाईन टाकल्यामुळे रस्त्याची दुर्दशा झाली आहे.  त्या रस्त्यावरून आपण, आपले बांधकाम सहीत सर्व अधिकारी, त्या रस्त्यावरून अनेक वेळा ये-जा करतात. तरीसुध्दा आपण त्यातून मार्ग का काढू शकत नाही ? पोस्ट ऑफिस समोरील मालवण क्रॉसिंग रस्ता मोरी साफ न केल्यामुळे त्याठिकाणी सर्व पाणी रस्त्यावरून वाहत आहे. त्यामुळे त्या ठिकाणी खड्डेच खड्डे पडले आहेत. . त्याठिकाणी रस्त्याना  ओहोळाचे स्वरूप आले आले आहे. . जिजामाता चौकात तशीच परिस्थिती आहे. आपले बांधकाम विभाग काय काम करतोय? असा सवाल श्री. भोगटे यांनी विचारला आहे.
    बाजारपेठेतील मराठी शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याला काँक्रिट गटार बांधले.  परंतु पाणी गटारातून न जाता रस्त्यावरुन वाहते  त्यामुळे रस्ता खराब झालाय. ह्याची जबाबदारी कोणाची? शहरातील रस्त्यांच्या अनेक ठिकाणच्या साईड पट्ट्या भरलेल्या नाहीत. वास्तविक रस्ता डांबरीकरण झाल्या झाल्या साईडपट्ट्या भरल्या पाहिजेत. परंतु त्या भरल्या जात नाहीत. हि गंभीर बाब आहे. साईड पट्टया न भरल्यामुळे टू व्हीलर रस्त्यावर उभ्या कराव्या लागतात. ह्याचा फटका प्रामाणिकपणे वागणाऱ्या जेष्ठ नागरिकाला बसला. पोलीसांनी ५०० रुपयांचा दंड भरायला लावला.  ह्याला जबाबदार कोणाला धरायचे?
    आपल्या मनात आल की साईड पट्ट्या भरायच्या, हा प्रकार योग्य नाही. त्यामुळे संबधीत ठेकेदारावर करवाई करावी एव्हढेच नव्हे तर त्यांचेकडून काम काढून घ्यावे. तसेच रस्त्यावरील पडलेले खड्डे उन्हाळ्यात न भरता आपल्या सोयीप्रमाणे पाऊस चालू असताना भरणाऱ्या ठेकेदारावर कारवाईची अपेक्षा आहे तसेच त्याला पुन्हा ठेका मिळता कामा नये.
    डॉन बॉस्को येथील पार्किंग च्या ठिकाणीं वाहने ये-जा करण्यासाठी रस्ता व्यवस्थित करा असे शनिवारी झालेल्या मीटिंग मध्ये ठरलेले होते. तो मार्ग जैसे थे आहे. त्या ठिकाणि चिखल झालेला आहे. त्या बाबत आपण काहीच केलेलें नाही. तर मग तो ठेकेदार करतों काय? आणि त्याकडे आपला दुर्लक्ष का? असा सवाल श्री. भोगटे यांनी करून ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

ruchira top