Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

ग्रामस्थ त्रस्त ; १ ऑक्टोबरला ग्रामपंचायतीवर कळशी मोर्चा काढणार

ग्रामस्थ त्रस्त ; १ ऑक्टोबरला ग्रामपंचायतीवर कळशी मोर्चा काढणार

मालवण : कोळंब येथील ग्रामस्थांनी १ ऑक्टोबर रोजी ग्रामपंचायतीवर कळशी मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. याबाबत जिल्हाधिकारी, तहसीलदार, ग्रामसचिव, पोलीस निरीक्षक, गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले आहे.

या निवेदनावर ग्रामपंचायत सदस्यांसह उपसरपंच विजय नेमळेकर यांचीही सही आहे. यात १५७ ग्रामस्थांनी ग्रामपंचायती विरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे. यात ग्रामपंचायत सदस्या संजना शेलटकर, संपदा प्रभू यांचाही समावेश आहे.

ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, कोळंब गावातील पाणीपुरवठा होणाऱ्या नळधारकांची बैठक समर्थ हॉल येथे घेण्यात आली होती. नळपाणी पुरवठा कर्मचारी मेघश्याम कवटकर यांनी पगार नियमितपणे मिळत नसल्याने राजीनामा दिलेला होता. बैठकीत त्यांना दर महिना पूर्ण झाल्यावर मासिक वेतन देण्याचे कबुल करण्यात आले होते. त्यानुसार कवटकर यांनी काम करण्यास तयारी दर्शविली होती. कवटकर यांचे पाच महिन्यांचे वेतन कोळंब ग्रामपंचायतीने न दिल्याने त्यांनी गणेशोत्सव काळात काम करण्याचे थांबविले. केंद्र आणि राज्य शासनामार्फत कोळंबसाठी कोट्यवधी रुपये खर्च नळयोजनेसाठी करण्यात आला आहे. तरीही नळयोजनेला पाणी येत नसल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. त्याच्या निषेधार्थ १ ऑक्टोबरला कळशी मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ग्रामस्थांना लेखी आश्वासन दिल्यास आंदोलन स्थगिती बाबत निर्णय घेण्यात येईल. तसेच कोळंब खालचावाडा येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला गटाराचे पाणी तुंबल्याने दुर्गंधी तसेच साथीचे रोग पसरण्याची शक्यता असल्याचे कळविले होते, मात्र ग्रामपंचायतीने कोणतीही कार्यवाही केलेली नाही. कोळंब स्मशानभूमीतील शेड बांधकाम करण्यासाठी तीन लाख रुपये आमदार निधी उपलब्ध होऊनही स्मशानशेडचे काम झालेले नाही. विधानसभा निवडणूक घोषित झाल्यावर आचारसंहिता लागल्यानंतर हा निधी प्राप्त होऊनही काही उपयोग होणार नाही. कोळंबचा विकास व नळपाणी पुरवठा करण्यास पदाधिकारी असमर्थ ठरत असल्याने आपली खुर्ची काम करणाऱ्यांकडे सोपवा, असेही ग्रामस्थांनी म्हटले आहे.

ruchira top