Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

आकेरी येथील दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू ; एक जखमी

आकेरी येथील दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू ; एक जखमी

कार्डियाक ऍम्ब्युलन्स उपलब्ध न झाल्याने होतकरू डॉक्टरने गमावले प्राण

निलेश जोशी | कुडाळ : आकेरी घाटात शनिवारी रात्री मोटार सायकल घसरून झालेल्या अपघातात पिंगुळी-आंबेडकरनगर येथील किशन केशव पिंगुळकर (वय-21 वर्षे) याचा मृत्यू झाला तर त्याच्या मागे बसलेला त्याचा शेजारी श्रीराम पांडुरंग केळुसकर हा जखमी झाला आहे. दरम्यान पुढील उपचारासाठी किशन पिंगुळकर याला गोवा बांबुळी येथे हलविण्यासाठी कार्डियाक ऍम्ब्युलन्सची गरज असताताना एकही ऍम्ब्युलन्स उपलब्ध झाली नाही. त्यामुळे व्हेटर्नरी डॉक्टर झालेल्या या युवकाला आपले प्राण गमवावे लागले. याबद्दल चीड व्यक्त होत आहे.


अपघाताबाबत कुडाळ पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार आकेरी येथे जुनी कोका कोला कंपनी समोरच्या रस्त्यावर उताराच्या ठिकाणी हा अपघात रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमाराला घडला. मयत किशन केशव पिंगुळकर हा आपला शेजारी श्रीराम पांडुरंग केळुस्कर यांच्यासह कोलगाव-सावंतवाडी येथून आपली मोटारसायकल (क्र .MH-O7-AE-2019) वरून पिंगुळीला आपल्या घरी जात असताना. आकेरी घाटात त्याची मोटारसायकल स्लिप होऊन मोटार सायकलवरील दोघेही रस्त्यावर फेकले गेले. अत्यवस्थ असलेल्या किशनला आणि जखमी झालेल्या श्रीराम याना सावंतवाडी येथील रुग्णालयात हलविण्यात आले. पण किशन खूप अत्यवस्थ असल्याने त्याला पुढील उपचारासाठी बांबोळी येथे हलवायचे होते. त्यासाठी कार्डियाक ऍम्ब्युलन्सची गरज होती. पण जिल्हयातील दोन्ही कार्डियाक ऍम्ब्युलन्स उपलब्ध होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे पहाटे चार वाजता किशन केशव पिंगुळकर य याची प्राणज्योत मालवली.


या अपघाताची खबर पिंगुळी येथील देवेंद्र पिंगुळकर यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिली. या प्रकरणी मोटार सायकल चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उप निरीक्षक रवींद्र भांड अधिक तपस करत आहेत.


दरम्यान किशन हा नुकताच व्हेटर्नरी डॉक्टर झाला होता. पिंगुळी येथे शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई-वडील, भाऊ-बहीण, काका-काकू असा परिवार आहे. किशन हा पिंगुळी ग्रामपंचायत सदस्य केशव उर्फ बंड्या पिंगुळकर यांचा मुलगा होता. किशनच्या अपघाती मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

ruchira top