मालवण : मालवण तालुक्यातील देवबाग येथे महाराष्ट्र नवनिर्माण लॉटरी सेना अध्यक्ष गणेश कदम यांच्या वतीने २७ सोलर लाईट मोफत देण्यात आले आहेत. आता देण्यात आलेली सोलर लाईट देवबाग चर्च येथेही लवकर बसवण्यात येईल, असे मनसे पदाधिकारी तथा देवबाग ग्रामपंचायत सदस्य पास्कोल अंतोन रॉड्रीग्ज यांनी सांगितले.
महाराष्ट्र नवनिर्माण लॉटरी सेना अध्यक्ष गणेश कदम यांच्या वतीने देवबाग गावासाठी यापूर्वी देण्यात आलेल्या स्ट्रीट लाईट सार्वजनिक ठिकाणे, धार्मिक स्थळे येथे बसवण्यात आल्या. मागील देवबाग दौऱ्यात गणेश कदम यांनी मनातील एक भावना व्यक्त केली होती, ती पुर्ण झाली. त्या नंतर पास्कोल रॉड्रीग्ज यांच्या मागणी नुसार सोलर लाईट प्रदान करण्यात आली आहे. याबद्दल देवबाग ग्रामपंचायत सदस्य पास्कोल अंतोन रॉड्रीग्ज आणि ग्रामस्थांकडून त्यांचे आभार व्यक्त केले आहेत.

