सिंधुदुर्ग : केंद्र शासनाचे पर्यावरण, वने व वातावरण बदल मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली यांनी पश्चिम घाट पर्यावरण संवेदनशील क्षेत्र घोषित करण्यासाठी अधिसूचना जाहीर केली आहे. मसुदा अधिसूचनेद्वारे महाराष्ट्र राज्यातील 13 जिल्हे 56 तालुके अंतर्गत 2515 गावांचे क्षेत्र पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केले आहे.
त्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, देवगड, वैभववाडी या पाच तालुक्यातील 198 गावांचा समावेश आहे. सदर अधिसूचना https://egazette.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
राज्यातील पश्चिम घाट पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केल्यास अशा स्थानिक रहिवाशांना त्याचा परिणाम होणार आहे. त्यांनी एनवोर्मेन्ट प्रोटेक्शन कायदा 1986 व नियम 1986 मधील तरतुदीनुसार त्याचे आक्षेप 60 दिवसाच्या आत केंद्रशासनाच्या पर्यावरण, वने, वातावरण बदल मंत्रालय भारत सरकार, नवी दिल्ली यांच्या esz-mef@nic.in या ईमेल आयडीवर आक्षेप नोंदवणे आवश्यक आहे.

