Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

मालवणात सिंधुविजय पर्यटन सेवा उद्योग सेनेचा दिमाखात शुभारंभ

मालवणात सिंधुविजय पर्यटन सेवा उद्योग सेनेचा दिमाखात शुभारंभ

मालवण : मालवण, आंबोली यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन व्यवसाय आज वृद्धिंगत होत पर्यटन व्यावसायिकांनी पर्यटनातील अनेक गोष्टींवर लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. पर्यटन व्यावसायिकांनी पर्यटकांशी विश्वासाचे नाते निर्माण केल्यास पर्यटन व्यवसाय वाढीस अधिक चालना मिळेल. सिंधुविजय पर्यटन सेवा उद्योग सेनेच्या माध्यमातून पर्यटन व्यावसायिकांचे प्रश्न सुटण्यास मदत होईल, असे प्रतिपादन आंबोली येथील फुलपाखरु तज्ज्ञ व पर्यटन व्यावसायिक हेमंत ओगले यांनी येथे केले.


मालवण मधील पर्यटन व्यावसायिकांनी एकत्र येऊन सुरु केलेल्या सिंधुविजय पर्यटन सेवा उद्योग सेना या संस्थेचा शुभारंभ सोहळा भरड येथील मालवण हेरिटेज येथे झाला. यावेळी आंबोली येथील फुलपाखरू तज्ज्ञ व व्हिसलिंग वूड्सचे संचालक हेमंत ओगले यांच्या हस्ते या संस्थेचे उदघाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर जलतरण प्रशिक्षक प्रफुल्ल गवंडे, ज्येष्ठ हॉटेल व्यवसायिक नितीन वाळके, पर्यटन व्यावसायिक रुपेश प्रभू, ठाकरे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर आदी उपस्थित होते.


यावेळी नितीन वाळके यांनी प्रास्ताविक करत या नव्या संस्थेच्या स्थापनेमागील संकल्पना स्पष्ट केली. मालवणसह जिल्ह्यातील पर्यटनात दर काही वर्षांनी बदल होत आहेत. पर्यटनातील मूलभूत तसेच काळानुसार विविध समस्या पर्यटन व्यावसायिकांसमोर निर्माण होत आहेत. आर्थिक, विपणन, जाहिरात, तंत्रज्ञान तसेच पर्यटन सेवा देण्याबाबत भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत सामुदायिक पद्धतीने मार्ग काढण्यासाठी, त्यातून पर्यटन व्यवसाय वृद्धी होण्यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आल्याचे यावेळी वाळके यांनी सांगितले.
यावेळी हेमंत ओगले यांचा सत्कार करण्यात आला. तसेच मालवण जेटी समुद्रात बुडणाऱ्या पर्यटकाला वाचविणाऱ्या पोहण्याचे प्रशिक्षण घेणाऱ्या लहान मुलांचे जलतरण प्रशिक्षक प्रफुल्ल गवंडे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच जलतरण विषयावर गवंडे यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी भाई गोवेकर, रुपेश प्रभू यांनी विचार मांडले. यावेळी पर्यटन विषयावर चर्चासत्र पार पडले.
यावेळी हरी खोबरेकर, रश्मीन रोगे, भगवान लुडबे, बाबी जोगी, दादा वेंगुर्लेकर, संजय गावडे, मनोज मेथर, पूनम चव्हाण, सेजल परब यासंह अनेक पर्यटन व्यावसायिक उपस्थित होते.

ruchira top