पर्यटन व्यावसायिक महासंघ, तारकर्ली पर्यंटन विकास संस्था यांचे भव्यदिव्य आयोजन
अपरिचित सिंधुदुर्ग रिल्स स्पर्धा व पाककला स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव
पर्यटन संचलनालयाच्या वतीने पर्यटन महासंघ अध्यक्ष बाबा मोंडकर, जितेंद्र पंडित, मीनल परब यांचा विशेष सन्मान
मालवण | प्रतिनिधी : पर्यटन व्यावसायिक महासंघ आणि तारकर्ली पर्यंटन विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यटन दिन सोहळा देवबाग येथील मत्स्यगंधा थिएटर याठिकाणी भव्यदिव्य स्वरूपात मोठया उत्साहात संपन्न झाला.


पर्यटन विषयावर विचारमंथन होत असताना पर्यटन क्षेत्रात कार्यरत उपस्थित मान्यवरांचे विचार दिशादर्शक ठरले. सिंधुदुर्गचा अधिकाधिक पर्यटन विकास हे व्हिजन ठेवून अपरिचित पर्यटन स्थळांचा शोध ही संकल्पना नावीन्यपूर्ण ठरली. सोबतच पर्यटकांना येथील पर्यटन प्रवासात अधिक सुलभता यावी यासाठी मोठया शहराच्या धर्तीवर तयार केलेल्या रिक्षा राईड अँपचे उदघाटन व येथील संस्कृती लोककला यांचे दर्शन घडवणारे कार्यक्रम आयोजनाचा मानस पर्यटन विकासातील पुढचे पाऊल असाच ठरला. उपस्थित सर्वच मान्यवरांनी पर्यटन व्यावसायिक महासंघ व तारकर्ली पर्यटन विकास संस्था संघटितपणे करत असलेल्या पर्यटन क्षेत्रातील कार्याचे विशेष कौतुक केले. पर्यटन संचलनालय कोकण विभाग उपसंचालक हनुमंत हेडे यांनी पर्यटन विकासाच्या कार्यात पर्यटन महासंघास आवश्यक ते सर्व सहकार्य यापुढेही केले जाईल असे स्पष्ट करताना अध्यक्ष विष्णु (बाबा) मोंडकर यांच्या पर्यटन क्षेत्रातील सेवाभावी कार्याचे विशेष कौतुक केले. शासनाच्या पर्यटन संचानलयाच्या वतीने बाबा मोंडकर यांचा विशेष सन्मान हनुमंत हेडे यांच्या वतीने करण्यात आला. यासोबत जितेंद्र पंडित, मीनल परब या पर्यटन उद्योग क्षेत्रातील व्यक्तीमत्वाना ही सन्मानित करण्यात आले. यांसह विविध क्षेत्रातील यशस्वी व्यक्तींचे सत्कार यावेळी करण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन लोगोचे अनावर यावेळी हनुमंत हेडे यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले. वेंगुर्ले येथील आर्किटेक प्राजक्ता गोसावी यांनी हा लोगो डिझाईन केला आहे. सर्वांनी लोगोचे कौतुक केले.

या कार्यक्रम सोहळ्यास पर्यटन संचनलयाचे हनुमंत हेडे, लखमराजे सावंत-भोसले, विष्णू उर्फ बाबा मोंडकर, सचिव ऍड. नकुल पार्सेकर, वेंगुर्ला माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, तारकर्ली पर्यटन विकास संस्थेचे संस्थापक रवींद्र खानविलकर, किशोर दाभोळकर, डॉ. कमलेश चव्हाण, जितेंद्र पंडित, दीपक कुडाळकर, मंगेश जावकर, मेघा गावकर, संजना काकडे, गुरुनाथ राणे, लक्ष्मण तारी, संजय राणे बँक ऑफ बडोदा डिव्हिजनल मॅनेजरपुणे, तारकर्ली पर्यटन विकास संस्था अध्यक्ष सहदेव साळगावकर, रामा चोपडेकर, मनोज खोबरेकर, रुपेश खोबरेकर, मिलिंद झाड, युवा उद्योजक केदार झाड, दर्शन वेंगुर्लेकर, मिथीलेश मिठबावकर, अभय पाटकर, यशोधन पडवळ, मंदार गोवेकर, ज्ञानेश्वर सादये, प्रभाकर वाळवे, गणेश माडये, शुभम झाटये, मुन्ना झाड, लकी कांबळी, लारा मयेकर, बंटी कांबळी, मकरंद मयेकर, डॉ. चंद्रशेखर परब, नितीन कणसे, सुमेधा नाईक, धनश्री पाटील, एकता तारी, अनुराधा मयेकर यांसह पर्यटन व्यावसायिक, युवा उद्योजक, नागरिक उपस्थित होते.
लखमराजे सावंत-भोसले, दिलीप गिरप, सुमेधा नाईक यांनी पर्यटन व सिंधुदुर्ग विकास यावर दिशादर्शक विचार मांडले. यांसह अन्य मान्यवरही व्यक्त झाले. महासंघ अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी पर्यटन, विकास, आणि पर्यटनाची वाटचाल यावर अभ्यासपूर्ण मांडणी केली.
पर्यटन पॉलिसी 2024 बाबत हनुमंत हेडे यांनी सविस्तर माहिती दिली. अतिशय उत्साहात कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपेश खोबरेकर यांसह अक्षय सातार्डेकर यांनी केले.



- अपरिचित सिंधुदुर्ग पर्यटन स्थळे विजेते


पर्यटन व्यावसायिक महासंघ आणि तारकर्ली पर्यटन विकास संस्था यांच्या वतीने घेण्यात आलेल्या अपरिचित सिंधुदुर्ग या रील स्पर्धेचा निकाल जाहीर करत विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. यात प्रथम- देवेन कोळंबकर विषय, धामापूर तलाव, भीमाने एका दिवसात बांधलेले शिवमंदिर कोरजाई आणि कांदळगाव रामेश्वर मंदिर समोरील वडाच झाड येथील रिल्स होते. द्वितीय कोकण डॉट इन संजीत ठाकूर यांनी बोंबडेश्वर बुधवळे मालवण येथील रिल्स,
तृतीय वृषाली येवाळीकर - घोडे बाव ऐतिहासिक विहीर कुडाळ येथील रिल्स यासोबत
उत्तेजनार्थ - हर्षद तळवडेकर, ढोपर कोपर तलवार वायरी भूतनाथ, सर्वेश पेडणेकर कातळशिल्प विषयी माहिती देवगड पोखरबाव या रिल्सना गौरवण्यात आले. रिल्स स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.


पाककला स्पर्धेत नीता ओटवणेकर विजेत्या
पर्यटन व्यावसायिक महासंघ व तारकर्ली पर्यटन विकास संस्था यांच्या वतीने आयोजित खुल्या पाककला स्पर्धेत प्रथम, नीता सचिन ओटवणेकर ओरोस, द्वितीय अनंत माडकुलकर, पेंडुर, तृतीय आत्माराम देविदास कुबल देवबाग, उत्तेजनार्थ अनिता मयेकर, समीर कुंबरे यांना रोख रक्कम व पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.

