Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

देवबाग समुद्रात अडकलेल्या तरुणाला सुखरूप बाहेर आणण्यात स्थानिकांना यश

देवबाग समुद्रात अडकलेल्या तरुणाला सुखरूप बाहेर आणण्यात स्थानिकांना यश


मालवण | प्रतिनिधी : देवबाग समुद्र जवळील संगमात अडकलेल्या मच्छीमार तरुणाला मदत कार्य पुरविण्यात स्थानिकांना यश आले आहे. नोकेच्या इंजिनात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ही नौका समुद्रात, जोरदार वाऱ्यात अडकली होती. गुरुवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

देवबाग येथून आपल्या ताब्यातील दर्यासागर ही मासेमारी नौका घेवून स्वप्निल संजय सावजी, वय ३५ रा. सर्जेकोट हा मच्छीमार तरुण सर्जेकोट येथे निघाला होता.

देवबाग संगम या ठिकाणी नौका घेवून आला असताना नौके मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे स्वप्निल याच्या लक्षात आले. यावेळी त्याने किनाऱ्यावरील स्थानिकांशी मदतीसाठी संपर्क साधला. जोरदार वारा व संगमावरील लाटां मध्ये ही नौका अडकून पडल्याने स्वप्निल याला तात्काळ मदत पुरविणे आवश्यक बनले होते.

घटनेची माहिती समजताच किनाऱ्यावरील हरेश राणे, विशाल धुरी, संदीप तांडेल, लक्ष्मण कुमटेकर, संतोष शेलटकर, दिनेश तोरस्कर, ओंकार उपरकर, हर्षल पराडकर यांनी समुद्रात धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने स्वप्निल सावजी याची बोट तेथे दुरुस्त करून त्याला मदत पुरविण्यात आली.

ruchira top