Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

एसटी विभागनियंत्रक अभिजित पाटील यांची उचलबांगडी करा !

एसटी विभागनियंत्रक अभिजित पाटील यांची उचलबांगडी करा !

संदेश पारकर आणि सतीश सावंत यांची मागणी


नाही तर ४ ऑक्टोबर रोजी कणकवलीत धरणे आंदोलन

निलेश जोशी | कुडाळ : सिंधुदुर्गचे राज्य परिवहन विभागाचे विभाग नियंत्रक अभिजित पाटील यांचा कारभार अत्यंत भोंगळ असून त्यांच्याबद्दल अनेक तक्रारी आहेत. त्यामुळे त्यांची तातडीने उचलबांगडी करावी अशी मागणी ठाकरे गट शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर आणि कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी राज्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडे केली आहे. त्यांची बदली न झाल्यास येत्या ४ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता विभागनियंत्रक कार्यालयासमोर धरणे आंदोलन काण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
त्यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे, रा.प. सिंधुदुर्ग विभागाचे विभाग नियंत्रक अभिजित पाटील यांचा कारभार हा अतिशय भोंगळ व महामंडळाची हानी व प्रवासी वर्गाची गैरसोय करणारा असून तो अतिशय मनमानीपणे चालू आहे व त्याचा त्रास हा सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. माहे. जुलै २०२३ मध्ये कुडाळ येथे शासनातर्फे झालेल्या "शासन आपल्या दारी या कार्यक्रमाची बिल महामंडळाकडून ८६,००,०००/-रु चुकीच्या पद्धतीने बनविले व ते जिल्हाधिकारी यांनी सदर बिल तपासून सदर बिले चुकीची बनवून सादर केल्याचे पत्र महामंडळास सादर केली व जिल्हाधिकारी यांनी करारानुसार ६०,००,०००/- बिल अदा केले. उर्वरित २६,००,०००/- रक्कमेची हानी या विभागनियंत्रकाच्या भोंगळ कारभारामुळे होत आहे.
   दुसरी गोष्ट,  पूर्ण भारमानानुसार आणि लोकांची मागणी असतानाही लांब पल्ल्याच्या चार शयनयान गाड्या या आपण चालवण्यास सक्षम नसल्यामुळे इतर विभागाकडे वर्ग करण्यात याव्यात असे पत्र दिले. यातून विभागनियंत्रक यांचे खाजगी बस चालकांशी असलेले संधान लक्षात येते. व त्यामुळे महामंडळाला उत्पन्न मिळवुन देणान्या गाड्या जाणीवपूर्वक बंद करून प्रवाश्यांची आणि महामंडळाची हानी केली आहे.
  त्याचबरोबर  चुकीच्या पद्धतीने महामंडळाचा सिंधुदुर्ग विभागातील काम हाताळत असलेने विभागनियंत्रक यांचा कुठलाच लक्ष नसलेकारणाने गाड्यांच्या अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. नादुरुस्त गाड्या हेच या मागचे मोठे कारण आहे. तसेच बऱ्याचशा गावातील फेऱ्या तसेच शालेय फेऱ्या बंद असून अवैध प्रवासी वाहतूक ही जोरदार चालू आहे. विभाग नियंत्रकांचे धोरण हे खाजगी वाहतूकीला पाठीशी घालणारे आहे. वेंगुर्ला, सावंतवाडी, देवगड बसस्थानकांचे नुतनीकरण काम सुरु असताना अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे सदर कामे पूर्ण होत नाहीत तसेच गरजेनुसार काम न होता ठेकेदार पोसण्यासाठीच बोगस कामे होत आहेत.
    तसेच अभिजित पाटील यांच्या विरोधात वारंवार तक्रार देऊनही आपले कडून कुठलीही कारवाई होताना दिसत नाही. त्यांची बदली पालघर येथे झालेली असतानाही त्यांना येथून मोडण्यात आलेले नाही. विभागनियंत्रक यांना तातडीने कार्यमुक्त न केल्यास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे वतीने कणकवली येथील विभागनियंत्रक कार्यालयासमोर शुक्रवार दि. ०४/१०/२०२४ सकाळी ११.०० वा. धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संदेश पारकर आणि सतीश सावंत यांनी दिला आहे.

ruchira top