सिंधुदुर्ग : जनतेच्या समस्या जाणून त्यांना न्याय देण्यासाठी जनता दरबारचे आयोजन करून तो यशस्वी केल्याबद्दल मालवण येथील भाजपा शिवसेना पदाधिकारी यांच्या वतीने जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे जनतेच्या वतीने आभार मानले. यावेळी शिक्षण मंत्री दीपक केसरकार हेही उपस्थित होते. त्यांचेही आभार मानण्यात आले.

जनतेच्या समस्या जाणून त्यांना न्याय देण्यासाठी जनता दरबारचे आयोजन करून तो यशस्वी केल्याबद्दल पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे जिल्हा नियोजन समिती सदस्य अशोक सावंत यांनी जनतेच्या वतीने मानले आभार मानले. यावेळी शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे ही उपस्थित होते. यावेळी भाजपा पदाधिकारी बाबा परब, शिवसेना पदाधिकारी बबन शिंदे, भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, आप्पा लुडबे, राजु परुळेकर, संतोष गांवकर, ललित चव्हाण, सुशील गावडे, विरेश पवार यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

