मालवण : स्वच्छता हि सेवा अभियान 2024, स्वच्छता की भागिदारी -स्वभाव स्वच्छता , संस्कार स्वच्छता व स्वच्छ भारत अभियान 2.0 अंतर्गत शहर स्वच्छते साठी झटणाऱ्या स्वच्छता दूतांचे आरोग्य शिबीर संपन्न झाले. मालवण नगरपरिषद , मालवण स्वच्छता हि सेवा अभियान 2024” स्वच्छता की भागिदारी -स्वभाव स्वच्छता , संस्कार स्वच्छता व स्वच्छ भारत अभियान 2.0 अंतर्गत केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय , भारत सरकार यांनी स्वच्छता पंधरवडा अंतर्गत स्वछता ही सेवा स्वभाव स्वच्छता- संस्कार स्वच्छता यामध्ये विविध कार्यक्रम घेण्याचे आदेशित केले होते .

त्यानुषंगाने २३ सप्टेंबर रोजी मालवण नगरपरिषदचे मा. मुख्याधिकारी श्री. संतोष जिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली मालवण नगरपरिषद कडून सफाई मित्र सुरक्षा शिबीर अंतर्गत आरोग्य शिबीर राबविण्यात आले, त्यामध्ये मालवण नगरपरिषद मधील सर्व सफाई मित्रांची आरोग्य तपासणी करण्यात आली तसेच त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.


