मालवणात नारी शक्तीची हाक
सकाळी 10:30 वा. भरड दत्त मंदिर येथे एकत्र येत....
मालवण | प्रतिनिधी : शिवप्रभुंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सुसंस्कृत मालवणात बुधवार 25 सप्टेंबर रोजी प्रत्येकाला शरमेने मान खाली घालावी लागेल अशी घटना घडली आहे. खरंतर देशात महिला सबलीकरण आणि सक्षमीकरणाचे वारे जोरात वाहत असताना आपल्या मालवण शहरात दिवसा ढवळ्या भर दुपारी भर वस्तीत एका नराधमाने अबलेवर पेट्रोल ओतले व तिला पेटवून दिले. हे कृत्य करणारा पळून गेला. परंतु तो पळून जाताना त्याने मालवणच्या संस्कृती आणि सभ्यतेला काळिमा फासला. सौ. सौभाग्यश्वरी गोवेकर (पूर्वाश्रमीची प्रीती केळूसकर) या महिलेवर जो तिच्याच पूर्वाश्रमीच्या पती म्हणवून घेणाऱ्या नराधमाने तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करत यमसदनाला पाठवले, त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. यापुढे असे नीच कृत्य करण्यास कोणी धजावता नये. यासाठी पोलीसांनी कठोरात कठोर कारवाई करावी म्हणून सर्वपक्षीय महिलांचे संघटन हे मालवण तहसीलदार व मालवण पोलीस यांना भेट देऊन निवेदन आज गुरुवार २६ सप्टेंबर रोजी करण्यात येत आहे.
महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी, अभागी सौ प्रीतीला न्याय देण्यासाठी जात, पात, पक्ष भेद विसरून सर्वांनी एकत्र यावे, गुरुवारी सकाळी १०. ३० वा. सर्वपक्षीय महिलांनी तसेच नागरिकांनी दत्त मंदिर भरड नाका मालवण येथे एकत्र जमावे, असे आवाहन आम्ही यानिमित्ताने करत आहोत.
सौ प्रीती केळुसकर हिला भावपूर्ण श्रद्धांजली !!🙏
असे आवाहन,
सौ. शीतल बांदेकर
सौ अमृता वाळके
सौ. राणी पराडकर
सौ. महीमा मयेकर
सौ. अन्वेषा आचरेकर
सौ. पूनम चव्हाण
सौ. शिल्पा खोत
सौ. पल्लवी तारी
आणि मालवणातील असंख्य महिला भगिनी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

