Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

'तर' कार्यालयात बसू देणार नाही...

'तर' कार्यालयात बसू देणार नाही...

मनसे उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर यांचा इशारा


मालवण : नौसेना दिनाचा कार्यक्रम मालवणात झाला आणि ह्या कार्यक्रमात आपली पाठ थोपटून घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नौसेना यांच्या संगनमताने झालेल्या निकृष्ट कामाचा घाव हा सर्व शिवप्रेमीना बसला आहे. आता पुन्हा कोट्यवधीचा चुराडा करण्याचे काम पुन्हा एकदा सार्वजनिक बांधकाम विभागाने घाट घातला आहे. परंतु त्यांनी फक्त एकच गाठ मारुन ठेवावी की पुन्हा कामात काही हलगर्जीपणा झाला तर कार्यालयात बसू देणार नाही. असा इशारा मनसे उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर यांनी दिला आहे. हाच शहाणपणा जर त्यावेळी दाखवला असता तर ही वेळ ओढवली नसती. आम्हाला कोणत्याही परिस्थितीच राजकारण करायचं नाहीये. परंतु त्यावेळी नको ती घाईगडबड करुन शिवप्रेमींच्या भावनांशी खेळण्याच काम हे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नौसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.


जिल्ह्याचे पालकमंत्री हे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री असून सुद्धा जिल्ह्यातील रस्त्यांची काय अवस्था झाली आहे त्याचा सुद्धा एकदा पालकमंत्र्यांनी आढावा घ्यावा. रस्त्याचे डांबरीकरण रात्रीच्या वेळी सुद्धा करण्यात आले होते. त्यावेळी हे खात्याचे अधिकारी झोपले होते का? त्यामुळे सध्या जिल्ह्यातील रस्त्यांची काय अवस्था झाली आहे त्याचा सुद्धा एकदा पालकमंत्र्यांनी आढावा घ्यावा. जिल्ह्यात होणारी सर्व कामे ही अतिशय निकृष्ट दर्जाची करण्याच काम सध्या सुरु आहे. त्यावर कोणाचाही वचक राहिलेला नाही आहे.


या सर्व गोष्टींचा आढावा घेऊन पालकमंत्र्यांनी योग्य ती कारवाई संबंधितांवर करावी, अशी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आग्रही मागणी करत आहोत. लवकरच पालकमंत्र्यांची भेट घेऊन सर्व परिस्थिती निदर्शनास आणून देणार आहोत.आणि त्यानंतरही काही कारवाई न झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात येत्या १५ दिवसात उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा गणेश वाईरकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.

ruchira top