दरड कोसळल्याने अवजड वाहतूक बंद
दरड हटविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु
वैभववाडी : सोमवारी सायंकाळी झालेल्या ढग फुटी सदृश्य पावसामुळे भुईबावडा घाटात ठीक ठिकाणी दरडी कोसळल्याने रस्ता पूर्णता बंद झाला होता. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. बुधवारी तिसऱ्या दिवशीही अवजड वाहनांना वाहतूकीस बंद केला आहे. किरकोळ दुचाकी वाहने सोडली जात आहे. तिन ठिकाणी मोरी खचल्याने अवजड वाहतूकीला 'नो एंट्री' दिली आहे. मंगळवारी सकाळपासूनच दोन जेसीबीच्या साहाय्याने रात्री उशिरापर्यंत दरडी हटविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु होते.
घाट माथ्यावर तीन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. सोमवारी सायंकाळी उशिरा पावसाचा जोर वाढल्याने भुईबावडा घाटात ठिकठिकाणी दरडी कोसळल्या. त्यामुळे गगनबावडा खारेपाटण मार्ग पूर्णत बंद झाला होता. मंगळवारी सकाळपासून दरडी हटविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु होते. पावसाचा जोर कायम राहिल्यास ठिकठिकाणी दरडी कोसळण्याची दाट संभवना आहे.

