आदर्श रक्तदाता पुरस्कार सोहळा
देहदान आणि नेत्रदान संकल्प मार्गदर्शन व नावनोंदणी मोहीमेचेही आयोजन
मालवण : राष्ट्रीय स्वैच्छिक रक्तदान दिनानिमित्त, ग्लोबल रक्तदाते मालवण यांचा वतीने भव्य रक्तदान शिबिर आणि आदर्श रक्तदाता पुरस्कार सोहळा व फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन यांचा वतीने देहदान आणि नेत्रदान संकल्प मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.

मामा वरेरकर नाट्यगृह मालवण येथे दिनांक १ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते २ या वेळेत हे शिबिर संपन्न होणार आहे. त्यासोबतच फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन यांच्या वतीने देहदान आणि नेत्रदान संकल्प मार्गदर्शन व नावनोंदणी मोहीम संपन्न होणार आहे. तरी रक्तदान करून इतरांच्या आयुष्यात जीवनदायी क्षण देण्यासाठी रक्तदान करावे. असे आवाहन ग्लोबल रक्तदाते मालवण यांच्या वतीने करण्यात आले आले.

