Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

नौसेना दिन निधी खर्चास शासनाकडून जिल्हा नियोजन समितीला विशेष बाब म्हणून मान्यता

सिंधुदुर्गनगरी : नौसेना दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देशभरातील अधिकारी कर्मचारी तसेच पोलिस अधिकारी, कर्मचारी यांचे वास्तव्य होते. या भव्य कार्यक्रम आयोजित करताना प्रशासकीय दृष्ट्या खर्चाची तरतूद करणेसाठी विशेष बाब म्हणून शासनास प्रस्ताव सादर केला होता. शासनाकडून जिल्हा नियोजन समितीचे मंजूर निधीमधुन एक वेळची विशेष बाब म्हणून रक्कम रू. 554.00 लक्ष निधीस मान्यता देण्यात आली असल्याचे जिल्हा नियोजन विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.


या शासन मान्यतेच्या अधिन राहून; 1) विद्युत विभाग, रायगड यांना रू. 74.09 लाख, 2) पोलिस अधिक्षक कार्यालय, सिंधुदुर्ग यांना एकूण रू. 161.88 लाख, 3) निवासी उपजिल्हाधिकारी, सामान्य शाखा, सिंधदुर्ग यांना एकूण रू. 91.70 लाख 4) महावितरण विभाग, सिंधुदुर्ग यांना रू. 42.83 लाख. 5) जिल्हा माहिती कार्यालय, सिंधुदुर्ग यांना रू.दीड लाख, असे एकूण रू.372.00 लाख निधी वितरीत करण्यात आला.


या निधीचा वापर निवास व्यवस्था, विद्युत व्यवस्था, वाहने भाड्याने घेणे, चित्रिकरण करणे, चहापाणी, बंदोबस्ताच्या अनुषंगाने राज्य परिवहन मंडळाच्या बसेसचे अधिग्रहण करणे, तहसिलदार मालवण, वेंगुर्ला, कणकवली यांचेकडील निवास भोजन व सेफ हाऊस खर्च, स्टेशनरी खर्च इ. करिता करणेत आला असून झालेल्या खर्चाची उपयोगिता प्रमाणपत्रे संबंधित यंत्रणांकडून शासनास सादर केली आहेत. सदर उपयोगिता प्रमाणपत्राबाबत शासनाकडून कोणत्याही प्रकारचा आक्षेप घेणेत आलेला नाही. प्रत्यक्ष शासन मंजूर निधी पेक्षा कमी निधी खर्ची पडला आहे ही वस्तुस्थिती आहे. एकवेळची विशेष बाब म्हणून शासनाकडून मान्यताप्राप्त निधीच्या रकमेपेक्षा प्रत्यक्ष वितरीत रक्कम कमी आहे याबाबत कोणताही गैरव्यवहार झालेला नाही.

ruchira top