Tuesday, 27 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

तळगावमध्ये उबाठाला खिंडार ; कार्यकर्ते भाजपमध्ये

तळगावमध्ये उबाठाला खिंडार ; कार्यकर्ते भाजपमध्ये

भाजपा नेते निलेश राणे यांच्या उपस्थितीत केला भाजपमध्ये प्रवेश

निलेश जोशी | कुडाळ : माजी खासदार विनायक राऊत यांच्या तळगाव गावातील उपसरपंचसह उबाठा शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी व माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत कुडाळ येथील भाजप कार्यालय येथे प्रवेश केला या कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे तळगाव गावातील उबाठा शिवसेनेला भगदाड पडले आहे.


मालवण तालुक्यातील तळगाव येथील उबाठा शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी निलेश राणे यांची कुडाळ येथील भाजप कार्यालय येथे भेट घेतली आणि गेल्या दहा वर्षात तळगाव गावाचा कोणत्याही प्रकारचा विकास झाला नसल्याची खंत व्यक्त करून गावातील प्रत्येक वाडीमध्ये विकासाची गंगा गेली पाहिजे अशी मागणी या पदाधिकाऱ्यांनी करून भाजपमध्ये प्रवेश केला हा प्रवेश भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी व माजी खासदार निलेश राणे यांनी घेतला.


यावेळी तळगाव उपसरपंच संतोष पेडणेकर, जयवंत दळवी, चारुहास दळवी, मुरारी टेमकर, तळेगाव ग्रामपंचायत सदस्य श्वेता पेडणेकर, धोंडी दळवी, सुरेंद्र दळवी, एकनाथ तळगावकर, केशव सहदेव तळगावकर, अशोक दळवी, केशव तळगावकर, विजय राऊळ, अशोक दळवी, राजू सावंत, महेश फाले, अरुण वालावलकर, सुधाकर तळगावकर, राजू राणे, सागर फाले यांच्यासह अनेक शिवसैनिकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक बाबा परब, ओरोस मंडल अध्यक्ष दादा साहिल, भाजप प्रदेश सदस्य संध्या तेरसे, जगदीश चव्हाण, निलेश तेंडोलकर, विजय कांबळी आदी उपस्थित होते.


यावेळी भाजप नेते निलेश राणे यांनी सांगितले की गेल्या दहा वर्षांमध्ये तळगाव गावांमध्ये कोणत्याही प्रकारचा विकास झाला नाही म्हणूनच यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातून या गावाचा विकास आम्ही निश्चित करून त्यांना अपेक्षित असलेला गावचा विकास करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू त्यांना कधीही निराश होऊ देणार नाही माजी खासदार विनायक राऊत यांना आपल्या गावात साधा विकास निधी आणता आला नाही म्हणूनच त्यांच्या पक्षातील शिवसैनिकांनी भाजपमध्ये प्रवेश केला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले

ruchira top