Tuesday, 27 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली 'जनता दरबार'चे आयोजन

२५ ते २७ सप्टेंबर दरम्यान आयोजन

नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग : सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न तात्काळ सोडविणे, जनता व प्रशासन यांच्यामध्ये समन्वय साधणे तसेच जनतेच्या विकासाच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करणे अशा विविध समाजोपयोगी हेतुसाठी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून ऑगस्ट महिन्यात 'जनता दरबार' चे आयोजन करण्यात आले होते. या जनता दरबाराला सामान्य नागरिकांचा मिळालेला प्रतिसाद लक्षात घेता २५ ते २७ सप्टेंबर दरम्यान पुन्हा एकदा पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली 'जनता दरबाराचे आयोजन करण्यात आलेले आहे. हा जनता दरबार सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस- सिंधुदुर्ग येथे पार पडणार आहे.

दि २५ सप्टेंबर रोजी कणकवली विधानसभा क्षेत्रातील कणकवली, देवगड व वैभववाडी या तालुक्यातील नागरिकांच्या तक्रारी स्विकारल्या जाणार आहेत. दि. २६ सप्टेंबर रेाजी कुडाळ विधानसभा क्षेत्रातील कुडाळ व मालवण आणि दि २७ सप्टेंबर रोजी सावंतवाडी विधानसभा क्षेत्रातील सावंतवाडी, वेंगुर्ला आणि दोडामार्ग तालुक्यातील नागरिकांच्या तक्रारी स्विकारल्या जाणार आहेत. जनता दरबारामध्ये उपस्थित होणाऱ्या तक्रारी, अडचणींचे निराकरण करण्याच्या दृष्टीने जबाबदार अधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी नागरिकांनी जनता दरबारामध्ये आपल्या तक्रारी सादर करण्याचे आवाहन पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी केले आहे.

ruchira top