Tuesday, 27 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

जिल्हा रुग्णालय कुडाळ मध्ये आणा !

कुडाळ विकास समितीचे तहसीलदारांना पत्र

मागणी मान्य न झाल्यास आंदोलनात्मक पवित्रा

निलेश जोशी | कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हा रुग्णालय ओरस येथे कार्यान्वित होते. परंतु शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जिल्हा रुग्णालय या ठिकाणी कार्यान्वित झाल्याने जिल्हा रुग्णालय पूर्णपणे बंद अवस्थेत आहे. हे रुग्णालय जिल्ह्यात मध्यवर्ती असेलल्या कुडाळ शहरात आणावे अशी मागणी कुडाळ विकास समितीच्या वतीने करण्यात आली आहे. त्या आशयाचे निवेदन आज समितीच्या वतीने कुडाळ तहसीलदार वीरसिंग वसावे याना देण्यात आले. या मागणीचा विचार झाला नाहीतर आंदोलनात्मक पवित्रा घेण्यात येईल असा इशारा देखील समितीच्या वतीने देण्यात आला आहे.


या निवेदनात म्हटले आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हा रुग्णालय ओरस येथे कार्यान्वित होते. परंतु शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जिल्हा रुग्णालय या ठिकाणी कार्यान्वित झाल्याने जिल्हा रुग्णालय पूर्णपणे बंद अवस्थेत आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लोकांचे रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.


कुडाळ शहर हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मध्यवर्ती आहे. शहरातून राष्ट्रीय महामार्ग रेल्वे स्टेशन व जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना मध्यवर्ती असे ठिकाण आहे. तसेच अनेक खाजगी हॉस्पिटल कुडाळ येथे आहेत. इमर्जन्सी वेळेला खाजगी हॉस्पिटल मधील डॉक्टर सुविधा देऊ शकतात. यामुळे जिल्ह्यातील रुग्णाना कुडाळ शहरात जिल्हा रुग्णालय झाले तर फायदा होऊ शकतो


कुडाळ ग्रामीण रुग्णालय इमारत जीर्ण झाली आहे. हि इमारत निर्लेखित होऊ शकते. कुडाळ ग्रामीण रुग्णालय ज्या ठिकाणी कार्यान्वित आहे. ही इमारत निर्लेखित करून प्रशस्त जिल्हा रुग्णालयाची इमारत होऊ शकते. तसेच जुना सीईओ बंगला व ग्रामीण रुग्णालय कर्मचाऱ्यांची वसाहत ही जागा आरोग्य विभागाची आहे. येथे जिल्हा रुग्णालय डॉक्टर व कर्मचाऱ्यांची वसाहत होऊ शकते.


या सर्व बाबींचा विचार करून जिल्हा रुग्णालय कुडाळ ग्रामीण रुग्णालय येथे प्रशस्त इमारत होऊन कार्यान्वित करण्याचा प्रस्ताव आपल्या माध्यमातून शासनाकडे पाठवावा अशी विनंती या निवेदनात करण्यात आली येऊ.


या निवेदनाचा विचार झाला नाही तर, ३० सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्गनगरी येथे लाक्षणिक उपोषण व सोमवार दिनांक ७ ऑक्टोबर रोजी आमरण उपोषण करण्यात येईल. या निवेदनाचा विचार न झाल्यास कुडाळ बंद व अन्य आंदोलनात्मक पवित्रा घेण्यात येईल.असेही निवेदनात म्हटले आहे.


यावेळी अभय शिरसाट, काका कुडाळकर, प्रसाद शिरसाट, द्वारकानाथ घुर्ये, श्रीराम शिरसाट, तरबेज शेख, उमेश शिरसाट, विद्याप्रसाद बांदेकर, श्री. राणे, तौसिफ़ शेख आदी उपस्थित होते.

ruchira top