'कॉमेडीचा शार्प शूटर… सिरियल किलर'
कुडाळ : अद्वैत थिएटर्स सिंधुसंकल्प एंटरटेन्मेंट प्रा. लि.प्रस्तुत 'कॉमेडीचा शार्प शूटर, सिरीयल किलर' हे या व्यावसायिक नाटकाचे प्रयोग हे विजयादशमी पासून सर्वत्र प्रदर्शित होणार आहेत.
या नाटकामध्ये भाऊ कदम प्रमुख भूमिकेत असणार आहे. त्यासोबतच श्रद्धा हांडे, अश्विनी कुलकर्णी आणि तेजस पिंगुळकर हे कलाकार असणार आहे.
या नाटकामध्ये कुडाळचे सुपुत्रांची महत्त्वाची भूमिका आहे. कुडाळचे सुपुत्र प्रणय तेली हे निर्माते तर केदार देसाई हे लेखक दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून तेजस पिंगुळकर हे असणार आहेत. त्यामुळे संपूर्ण सिंधुदुर्गात त्याचे कौतुक केले जात आहे.

त्याचबरोबर नाटकाचे नेपथ्य प्रदीप मुळये, संगीत विजय गवंडे, प्रकाश श्याम चव्हाण तर नाटकाचे निर्माते हे राहुल भंडारे आणि प्रणय तेली हे आहेत.

