पर्यटन दिनानिमित्त पर्यटन व्यावसायिक महासंघाचे आयोजन
मालवण : जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून पर्यटन व्यावसायिक महासंघातर्फे अपरिचित सिंधुदुर्ग या Reels स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
जागतिक पर्यटन दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अपरिचित पर्यटन स्थळे जगासमोर आणायच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम पारितोषिक १०,००० रुपये , द्वितीय पारितोषिक ५,००० रुपये, तृतीय पारितोषिक ३,००० रुपये आकर्षक चषक देण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धकाला सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.
या स्पर्धेसाठी स्पर्धकांनी १ मिनिट ३० सेकंद पर्यंत व्हिडिओ तयार करून पाठवायचा आहे. तसेच सदर व्हिडिओ मध्ये असलेले स्थळ आणि स्पर्धक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असणे गरजेचे आहे. स्पर्धेचा निकाल हा व्हिडिओचा तांत्रिक दर्जा, काॅन्टेन्ट बेस आणि प्रेझेंटेशन यावर अवलंबून असणार आहे. सदर रील ही मराठी आणि मालवणी भाषेत तयार करायची आहे, तसेच त्या व्हिडिओ मध्ये त्या ठिकाणाबद्दलची पुरेशी माहिती असणे गरजेचे आहे.

व्हिडिओ परीक्षणाचे सर्व अधिकार हे मॅनेजमेंट कडे असणार आहेत. स्पर्धकांनी रिल पोस्ट करताना @paryatanvyavsayik या अकाउंटला collaboration करायचे आहे. व्हिडिओ अपलोड करायची अंतिम तारीख २५ सप्टेंबर रात्री १२ पर्यंत असणार असून स्पर्धेचे बक्षीस वितरण २७ सप्टेंबर रोजी करण्यात येणार आहे. रिल व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर स्पर्धकांनी ८२७५१०६३७५ या क्रमांकावर व्हिडीओ WhatsApp करणे आवश्यक आहे.
तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या वतीने तसेच तारकर्ली पर्यटन विकास संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

