सिंधुदुर्ग : तुम्ही सर्वांनी माझ्यावर प्रेमाचा जो वर्षाव केलात, ज्या शुभेच्छा दिल्यात; त्यामुळे माझ्या वाढदिवसाचा आनंद सहस्त्रगुणित झाला.
आपण व्यक्त केलेल्या शुभेच्छा म्हणजे केवळ सुंदर शब्दांचे फुलोरे नव्हते, तर त्यामागील भावनांचा ओलावा थेट हृदयांपर्यंत पोहोचला.
तुम्हा सर्वांचे प्रेम आणि विश्वास हीच माझी खरी शक्ती आहे. तुमचा हा विश्वास नेहमीच सोबत असेल, याची खात्री आहेच ! तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार ! अश्या आभार भावना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केल्या आहेत.

