माजी नगरसेवक यतीन खोत आणि सौ. शिल्पा खोत यांचा निसर्ग संवर्धनाचा आदर्शवत उपक्रम
मालवण : गणेशोत्सव हा प्रत्येकाचा जिवाभावाचा सण. प्रत्येक जण आपल्या परीने सोबत गणेशोत्सव साजरा करत असतो. मागील दहा वर्ष अखंडपणे गणेशोत्सव सोहळा जनतेसोबत साजरा करताना माजी नगरसेवक यतीन खोत आणि सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा खोत मालवण तालुक्यातील अनेक घरगुती गणपतीचे दर्शन घेत आहेत. त्यांच्यावतीने उपयोगी भेटवस्तू व पूजा साहित्य घराघरात भेट दिले जाते.






यावर्षीही यतीन खोत आणि शिल्पा खोत यांनी मालवण तालुक्यातील सुमारे ४०० गणपतींचे दर्शन घेतले. यंदा आगळा वेगळा उपक्रम राबवत सोनचाफ्याची कलमे देऊन निसर्ग संवर्धनाचा संदेश घराघरात पोहचवला गेला. नागरिकांनीही त्यांचे स्वागत कौतुक केले आहे.

