महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची कोकण विभागातील जिल्हानिहाय आढावा बैठक संपन्न
सिंधुदुर्ग : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी द्वारे गुरुवार दि. १९ सप्टेंबर रोजी कोकण विभागातील प्रत्येक जिल्हानिहाय आढावा बैठक मीरा - भाईंदर याठिकाणी आयोजित करण्यात आली होती.
या दरम्यान सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष इर्शाद शेख यांद्वारे आढावा सादर करण्यात आला.यावेळी उपस्थित पदाधिकारी कार्यकर्त्यां सोबत राज्य प्रभारी रमेश चेंनिथला व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चर्चा केली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रामुख्याने सावंतवाडी मतदारसंघ व संधी मिळाल्यास कणकवली मतदारसंघात पदाधिकारी निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याने या मतदारसंघास लढण्यास इच्छुक असलेले पदाधिकारी देखील उपस्थित होते.

कुडाळ - मालवण मतदारसंघात आमदार वैभव नाईक स्टँडिंग सीट असल्याने हा मतदारसंघ शिवसेना ( उबाठा ) पक्षाकडेच राहणार आहे.आघाडी असल्याने जिल्ह्यातील इतर दोन मतदारसंघात सावंतवाडी प्रमाणे कणकवली हा मतदारसंघ काँग्रेस पक्षाने लढवला तर काँग्रेस पक्षाला मानणारा मतदार वर्ग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असल्याने नक्कीच फायदा होईल म्हणून संधी मिळाल्यास या मतदारसंघासाठी आपणही इच्छुक असल्याच सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस अरविंद मोंडकर यांनी म्हटले आहे.

या आढावा चर्चासत्रा वेळी जिल्हा प्रभारी प्रदेश सचिव अजिंक्य देसाई, जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, जिल्हा उपाध्यक्ष नागेश मोरये, जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष किरण टेबुलकर, महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी, संदेश कोयंडे, कणकवली तालुका अध्यक्ष प्रदीप मांजरेकर, देवगड तालुकाध्यक्ष उमेश कुलकर्णी, सुरज घाडी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

