भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांच्याच पाठपुराव्यातून विकासकामे मंजूर
भाजपा युवामोर्चा शहर अध्यक्ष ललित चव्हाण
मालवण : महाराष्ट्र सुवर्ण जयंती राष्ट्रीय नगोराथ्यान अंतर्गत देऊळवाडा किर घर ते मोरया घरा पर्यन्त गटारावर लादी बसवणे हे विकास काम फक्तं भाजपा नेते माजी खासदार निलेशजी राणे साहेब यांच्याच पाठपुराव्यानेच झालेले आहे. या कामाचे श्रेय हे निलेशजी राणे यांचेच आहे. त्यांनी पालकमंत्री व खा. राणे साहेब यांच्या जवळ केलेल्या पाठपुराव्याने मालवण शहरात अनेक कामे मंजूर करुन घेतली. त्यातीलच हे काम आहे. या कामासाठी कार्यसम्राट नगरसेवक दिपक पाटकर, श्री. विजय केनवडेकर व स्थानिक ग्रामस्थांचा सततचा पाठपुरावा असल्यानेच हे काम मंजूर झाले आहे. वैभव नाईक यांचा काडीचाही संबंध या कामाशी नाही. असे भाजपा युवामोर्चा अध्यक्ष ललित चव्हाण यांनी सांगितले. या विकास कामाचे भूमिपूजन माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी केले. खा. नारायण राणे साहेब, पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब, माजी खासदार निलेश राणे साहेब यांच्याच माध्यमातून हे काम मंजूर झाल्याचे सांगितले. त्या नंतर शिवसेना (उबाठा) पदाधिकारी यांनी या विकास कामाचे श्रेय आ. वैभव नाईक यांचेही असल्याचे सांगत आभार मानले होते यावर ललित चव्हाण यांनी पक्षाच्या माध्यमातून भुमिका मांडली आहे.

