गणेशोत्सव काळात कायदा सुव्यवस्थेचे योग्य नियोजन केल्या बद्दल केले विशेष कौतुक
मालवण : गणेशोत्सव काळात कायदा सुव्यवस्थेचे योग्य नियोजन केल्या बद्दल मालवण शिवसेना (उबाठा) पदाधिकारी यांनी मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांची भेट घेत विशेष अभिनंदन केले आहे.
गणपती बाप्पा आगमन व विसर्जन मार्गांवर योग्य बंदोबस्त, गस्त तैनात ठेवण्यात आली. वाहतूक कोंडी होणार नाही याबाबतही चांगल्या प्रकारे नियोजन करण्यात आले. असे सांगत शिवसेना (उबाठा) पदाधिकारी यांनी भेट घेऊन कौतुक केले.
यावेळी शहर प्रमुख बाबी जोगी शहर प्रमुख, उमेश मांजरेकर उपशहर प्रमुख, गणेश कुडाळकर उप तालुका प्रमुख, भगवान लुडबे सरपंच वायरी, प्रसाद आडवनकर, मंदार ओरासकर युवासेना तालुका प्रमुख, सिद्धेश मांजरेकर, करणं खडपे, पियूष चव्हाण, सर्वेश लुडबे, मनीष आडकर, साहिल जाधव, अक्षय भोसले आदी उपस्थित होते.

