सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे विश्वस्त गोपाळ दळवी आणि दत्तू सावंत यांचा पाठपुरावा
मालवण : मालवण तालुक्यातील तळगाव येथील श्री देव रामेश्वर व श्री देव रवळनाथ मंदिराच्या परिसरात समाजमंदिर बांधकामासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून 50 लाख रुपये निधी शासनाकडून मंजूर करण्यात आला आहे. तळगावचे सुपुत्र तथा मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे विश्वस्त गोपाळ दळवी आणि दारवळवाडीचे सुपुत्र दत्तू सावंत यांनी पाठपुरावा केला होता. निधी मंजूर झाल्याबद्दल तळगाव ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले आहेत.

