मालवण | प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री ना. रवींद्र चव्हाण यांचा वाढदिवस भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या वतीने उत्साहात साजरा केला जात आहे. या निमित्त डोंबिवली पलावा सिटी येथील ना. रवींद्र चव्हाण यांच्या निवासस्थानी भाजपा मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर व पदाधिकारी यांनी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.
यावेळी तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, चिंदर उपसरपंच दीपक सुर्वे, भाजपा पदाधिकारी संतोष गांवकर, देवेंद्र हडकर आदी उपस्थित होते.

