Tuesday, 27 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

लक्षद्वीप बेटावर हेमा सरदेसाईकडून विद्यार्थ्यांनी घेतले संगीताचे धडे

फ्लाय९१ विमान कंपनीचे आयोजन

सिंधुदुर्ग : लक्षद्वीप ट्यूरिझमच्या सहयोगाने गोवा स्थित फ्लाय९१ या विमान सेवेने गोव्यातील संगीत शिकणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी लक्षद्वीप बेटावर संगीतमय कार्यक्रम अथवा सत्र आयोजित केला होता. प्रसिद्ध गायिका हेमा सरदेसाई यांनी या कार्यक्रमात सहभागी गोवा आणि लक्षद्वीपमधील एकूण २८ तरुण संगीत विद्यार्थ्यांना संगीताचे धडे दिले.
कार्यक्रमासाठी गोव्यातून एकूण ११ विध्यार्थी आणि पुरस्कार विजेत्या गायिका हेमा सरदेसाई फ्लाय९१ च्या विमानसेवेचा आस्वाद घेत बेटावर गेले होते. १३ सप्टेंबर रोजी हा संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. संगीत शिकणाऱ्या या मुलांना हा एक शैक्षणिक असा अनुभव होता. गोव्यातील ११ विद्यार्थ्यांसोबत १७ लक्षद्वीपातील स्थानिक विध्यार्थी होते. बंगाराम रिसॉर्टमध्ये त्यांची राहण्याची सुविधा होती. या वर्षाच्या सुरुवातीला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर या रिसॉर्टला महत्त्व प्राप्त झाले आहे. यापूर्वी २०२३ मध्ये G-20 शिखर परिषदेसह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रमुख कार्यक्रमांचे आयोजन इथे झाले होते.
११ ते १५ वयोगटातील विद्यार्थ्यांचा बेटावर हा एक खास दिवस होता, जिथे ते हेमा सरदेसाई यांच्यासोबत एक मजेदार संगीत सत्रात सहभागी झाले. हेमा सरदेसाई या गोव्यातील प्रसिद्ध गायिका आहेत. त्यांनी आवारा भँवरे (सपने,१९९६), ये दिल दिवाना (परदेस,१९९७) आणि बादल पे पांव है (चकदे इंडिया, २००७) या सारख्या लोकप्रिय बॉलिवूड चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत. मुलांनी फक्त संगीताचा आनंदच नाही तर हेमा सरदेसाई कडून मौल्यवान धडे सुद्धा घेतले, ज्याच्यामुळे त्यांच्यासाठी हा कार्यक्रम रोमांचक आणि संस्मरणीय अनुभव बनला. चॅरिटी म्युझिकल जॅम दरम्यान बेटावरील शाळेतील विद्यार्थ्यांनी अनेक सांस्कृतिक उपक्रमही सादर केले.
फ्लाय९१चे सीईओ आणि एमडी मनोज चाको कार्यक्रमाबद्दल बोलताना म्हणाले की, हेमा सरदेसाई यांच्या मार्गदर्शनामुळे मुलांना खूप फायदा होईल. मुलांनी संगीताद्वारे प्रेरित व्हावे, लक्षद्वीपच्या समुद्रकिना-याचा, सौंदर्याचा, शांततेचा आनंद लुटावा आणि याच सुरमयी वातावरणात संगीत अनुभवावे अशी या कार्यक्रमाची संकल्पना होती. फ्लाय९१ ने लक्षद्वीप टुरिझमसोबत एक नवीन प्रकारचा प्रवास अनुभव तयार केला आहे. या प्रवासात अभ्यागतांना प्रेक्षणीय स्थळांचा आनंद लुटता येईल. फ्लाय९१ आणि लक्षद्वीप टुरिझम मधल्या या प्रवास अनुभवाची सुरुवात गोवा आणि लक्षद्वीपमधील तरुण संगीतकारांना शिकण्याची आणि वाढण्याची विशेष संधी देऊन त्यांच्यासाठी अविस्मरणीय अनुभव निर्माण करून झाली.
“संगीत शिकू इच्छिणाऱ्या तरुण मुलांना प्रेरणा देण्याच्या या उदात्त कारणासाठी फ्लाय९१ सोबत भागीदारी करताना मला आनंद होत आहे. फ्लाय९१ ने मला लक्षद्वीप येण्याची संधी दिली ज्याच्या माध्यमातून मला ही शांतता अनुभवायला मिळाली आणि देवाचे अस्तित्व देखील जाणवले,” हेमा सरदेसाई म्हणाल्या.
अविस्मरणीय प्रवास देण्यासाठी फ्लाय९१ ने सातत्याने काम केले आहे. लक्षद्वीप सारख्या दुर्गम स्थळांना जोडत असलेल्या विमान कंपनीने विमान वाहतूक आणि प्रायोगिक प्रवास, विशेषत: प्रादेशिक केंद्रांना जोडण्यामध्ये सतत जोर दिला आहे. बेटाच्या मूळ सरोवरांच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेली संगीत संध्याकाळ हा एक जादुई अनुभव होता आणि या बेटाला भेट देणाऱ्या प्रवाशांना असे अनेक रोमांचक कार्यक्रम वा अनुभव मिळतील अशी अशा लक्षद्वीप टूरिझमच्या प्रवक्त्याने व्यक्त केली.

ruchira top