Tuesday, 27 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

जयदीप आपटेला न्यायालयीन कोठडी म्हणजे शिवप्रेमींच्या जखमेवर मीठ !

जयदीप आपटेला न्यायालयीन कोठडी म्हणजे शिवप्रेमींच्या जखमेवर मीठ !

आमदार वैभव नाईक यांची शिंदे- फडणवीस सरकार आणि पोलिसांवर जोरदार टीका

निलेश जोशी | कुडाळ : मालवण तालुक्यातील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी अटकेत असलेला प्रमुख आरोपी जयदीप आपटेला न्यायालयीन कोठडी म्हणजे शिवप्रेमींच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे, अशी टीका आमदार वैभव नाईक यांनी केली आहे. पुतळ्याच्या कामातील भ्रष्टाचार लपविण्यासाठीच जयदीप आपटेला सरकारकडून अभय दिले जात असून सा. बां. विभाग, गृह खाते आणि शिंदे-फडणवीस सरकार यांच्या संगनमताने पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप आमदार वैभव नाईक यांनी केला आहे.


मालवण तालुक्यातील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी अटकेत असलेला प्रमुख आरोपी जयदीप आपटेला २४ सप्टेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. छत्रपतींचा अपमान करणाऱ्या जयदीप आपटेला केवळ ९ दिवसच पोलीस कोठडीत ठेवण्यात आले.जयदीप आपटेला न्यायालयीन कोठडी मिळाल्याने त्याचा जामिनाचा मार्ग मोकळा झाला आहे. शिवप्रेमींच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार असून सरकारकडून आणि पोलिसांकडून जयदीप आपटेच्या विरोधात मालवण न्यायालयात सक्षम बाजू न मांडल्यानेच त्याला दिलासा मिळाला आहे.
सुरुवातीला जयदीप आपटेचा शोध घेण्यात पोलिसांना अपयश आले होते. त्यानंतर १० दिवसांनी ४ सप्टेंबर रोजी तो त्याच्या घराजवळच पोलिसांना सापडला होता.

जयदीप आपटे याला अटक केल्यानंतर अन्य कोणाही संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केलेली नाही. व आता केवळ ९ दिवसांत जयदीप आपटेची पोलीस कोठडी संपल्याने जयदीप आपटेची अटक हि प्री प्लॅन असण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकंदर या घटनांवरून सार्वजनिक बांधकाम विभाग, गृह खाते आणि शिंदे-फडणवीस सरकार यांच्या संगनमताने पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा संशय आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केला असून हा भ्रष्टाचार लपविण्यासाठीच जयदीप आपटेला पोलिसांकडून अभय देण्यात आल्याची टीका कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी केली आहे.

ruchira top