जुबेर खान | मालवण : शिवसेना उपजिल्हाप्रमुख विश्वास गांवकर कुटुंबीय यांच्या गांवकर वाडा येथील घरी भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांनी गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी गांवकर कुटुंबीय यांच्या वतीने निलेश राणे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी भाजप पदाधिकारी अशोक सावंत,मालवण तालुका प्रमुख धोंडी चिंदरकर, दीपक पाटकर, सिंधुदुर्ग बँक संचालक बाबा परब, ललित चव्हाण, गणेश लुडबे, नारायण लुडबे,विहार कोदे, निशय पालेकर
तसेच शिवसेना युवासेना जिल्हाप्रमुख (सोशल मीडिया) हर्षद पारकर, देवबाग - भूतनाथ विभागप्रमुख कमलाकांत पारकर हे यावेळी उपस्थित होते.

