मालवण | प्रतिनिधी : भाजपा नेते निलेश राणे यांनी शुक्रवारी मालवण शहर दौऱ्यात अनेक ठिकाणी दुचाकीने घरोघरी जाऊन गणपती बाप्पांचे दर्शन घेतले.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, विजय केनवडेकर, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, शहरअध्यक्ष बाबा मोंडकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, माजी नगरसेवक दीपक पाटकर, तसेच माजी नागराध्यक्ष अशोक तोडणकर, माजी उपनगराध्यक्ष राजन वराडकर, आबा हडकर, युवामोर्चा जिल्हा उपाध्यक्ष राकेश सावंत, शहरअध्यक्ष ललित चव्हाण, राजु बिडये, निषय पालेकर, राजा मांजरेकर, नारायण लुडबे यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. भाजपा पदाधिकारी सुदेश आचरेकर सौं स्नेहा आचरेकर कुटुंबिय, मोहन वराडकर ममता वराडकर कुटुंबीय, विजय केनवडेकर, व्यापारी संघ अध्यक्ष उमेश नेरुरकर सौ स्वप्नाली नेरुरकर कुटुंबिय, विजय चव्हाण, बाळू तारी, आबा हडकर, राजन वराडकर, अशोक तोडणकर यांसह अनेक ठिकाणी निलेश राणे यांनी रात्री उशिरा पर्यत अनेक ठिकाणी गणपाती बाप्पांचे दर्शन घेतले.
नागरिकांनी घेतले फोटो आणि सेल्फी निलेश राणे यांनी मालवण शहारात दुचाकीवरून अनेक ठिकाणी घरोघरी जात गणपती बाप्पांचे दर्शन घेतले. यावेळी अनेक ठिकाणी नागरिक निलेश राणे यांच्या सोबत फोटो, सेल्फी घेण्यासाठी गर्दी करत होते.