मालवणात मोफत गणेश विसर्जन पथक
मालवण : कोकणातील गणेशोत्सव हा मोठ्या थाटाने पण तितकाच पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. दीड दिवस, पाच दिवस, गौरी गणपती, सात दिवस, अकरा दिवस बाप्पाची सेवा करून यथायोग्य, पारंपारिक रीतीनुसार त्यांचे पाण्यामध्ये विसर्जन केले जाते. अशा वेळी किनारपट्टीवरील पाण्यामध्ये जाऊन कोणतीही जीवितहानी घडू नये यासाठीच प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी सुद्धा हरी खोबरेकर व कै. आतू फर्नांडिस मित्र मंडळ त्यांच्या वतीने मोफत गणेश विसर्जन पथकामार्फत आयोजन मालवण शहरामध्ये सेवा दिली जात आहे.

कोणतीही दुर्घटना न घडता, मनोभावे बाप्पाला निरोप देण्यासाठीच हे मंडळ दरवर्षी गणपती विसर्जनाचं काम एक सेवा म्हणून करत असतात. यंदाही या पथकाच्या मदतीने भक्तिमय वातावरणात गणेशाला निरोप देण्यात आला.

या पथकात बॉबी बटाव, बाबल फर्नाडीस , भावेश बटाव, रेक्स परेरा , सोमनाथ लंबोर, यश देसाई, तेजस घारकर, रोहित सकपाळ, परेश वाघ, रोशन कांबळी, संचित देसाई, आशिष फर्नाडीस, सोहम हिंदळेकर, ओमकार नाईक, तन्मय येमकर, सुजल कदम, प्रथमेश परब, कार्तिक बटाव, इनो परेरा, जॅकी परेरा आदीच्या मदतीने गणेश विसर्जन करण्यात आले.

