Tuesday, 27 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

गणेशोत्सवात गॅस धारकांची अडवणूक झाल्यास आंदोलन

गणेशोत्सवात गॅस धारकांची अडवणूक झाल्यास आंदोलन

युवा सेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट यांचा इशारा

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात सध्या गणेशोत्सवाचे वातावरण आहे.  उत्सवाच्या निमित्ताने महिला वर्गाची स्वयंपाक घरात लगबग सुरू असून गॅस वितरण यंत्रणा मात्र गॅस धारकांना वेठीस धरत आहेत.  तांत्रिक कारणामुळे गॅस धारकांची अडवणूक करण्यात येत असून किमान गणपतीच्या काळात तरी ही अडवणूक थांबवावी आणि गणेश भक्तांना दिलासा द्यावा,  अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन छेडू, असा इशारा युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाठ यांनी दिला आहे. 
 सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेशोत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो. चाकरमानी मोठ्या संख्येने गावाकडे येतात.  आरती, भजने, पाहुणे यामुळे घराघरात माणसांची रेलचेल असते.  सहाजिकच घरगुती वापराचा गॅस अधिक प्रमाणात लागतो आणि  वर्षाच्या इतर वेळेच्या तुलनेत गणेशोत्सवात गॅस लवकर संपतो.  सरकारने आणि गॅस वितरण यंत्रणांनी गॅस देताना अनेक औपचारिकता सक्तीच्या केल्या आहेत.  ज्यात नोंदणीकृत मोबाईल क्रमांका वरून बुकिंग करणे,  प्रत्यक्ष गॅसधारकांनी हजर राहणे,  ओटीपी सांगणे या बाबी सक्तीच्या आहेत.  सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोबाईल नेटवर्क पुरेसे नसल्यामुळे ओटीपी येण्यास विलंब होतो त्यामुळे गॅसधारकांची मोठी अडचण होते.  असंख्य गॅसधारक गॅस न घेताच घरी परतल्याच्या तक्रारी आल्या आहेत.  वेळीच गॅस उपलब्ध न झाल्यामुळे सर्वाधिक कुचंबणा घरातील महिलांची होत आहे.  ही अडचण ओळखून सरकारी यंत्रणा आणि गॅस वितरण यंत्रणा यांनी किमान गणेशोत्सव काळात गॅस धारकांची अडवणूक थांबवावी,  अन्यथा आंदोलनाचा इशारा शिरसाट यांनी दिला आहे. 
सरकार एकीकडे महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणते.  महिलांसाठी अन्नपूर्णा योजना आणून तीन गॅस मोफत देण्यात येणार आहेत.  मात्र हक्काचे आणि विकतचे गॅस घेताना महिलांची अडवणूक केली जात आहे हा मोठा विरोधाभास असल्याचे शिरसाट याचे म्हणणे आहे.  गॅस देतानाच्या औपचारिकतांचे गणेशोत्सवानंतर पालन करावे. त्याला आपली कोणतीही हरकत असणार नाही, मात्र उत्सव काळात ही बंधने शिथिल करावीत. जेणेकरून गणेशोत्सव सुरळीत संपन्न होईल आणि नागरिकांची कोणतीही अडचण होणार नाही असे शिरसाट यांनी म्हटले आहे.

https://www.youtube.com/playlist?list=PLrVSFrGEjrLR4S7WjJVC5VZuh07u9T6AY

ruchira top