गौरी सजावट स्पर्धा
शिवसेना ( उबाठा) युवती सेना सिंधुदुर्ग यांचे आयोजन
जुबेर खान | मालवण : शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवती सेना सिंधुदुर्ग यांच्यावतीने 'गौराई माझी लाडाची ग…' या गौरी सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
गौराई माझी लाडाची ग…या सजावट स्पर्धांमध्ये विजेत्यांना प्रथम क्रमांक ५,५५५ रुपये द्वितीय क्रमांक ४,४४४ रुपये तृतीय क्रमांक ३,३३३ रुपये व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. तसेच इतर सहभागी स्पर्धकांना देखील आकर्षक भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी आपल्या घरी बसवलेल्या गणपती व गौरी यांच्या सजावटीचा सेल्फी व व्हिडिओसहित पूर्ण नाव आणि पत्ता 9421971159 या मोबाईल नंबर वर व्हाट्सअप करायचा असून फोटो पाठवण्याची अंतिम तारीख ही 12 सप्टेंबर दुपारी दोन वाजेपर्यंत असणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या स्पर्धेमध्ये भाग घ्यावे असे आवाहन शिवसेना ( उबाठा) युवती सेना जिल्हाप्रमुख निनाक्षी शिंदे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 9421977159, 8698608374 , 9325942798 यांच्याशी संपर्क साधावा

