पाच वर्षे संस्थेचा अखंड उपक्रम
भाऊ भोगले | बागायत : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पावणाई देवी महिला दुग्ध उत्पादक (कृषी) सहकारी संस्था मसुरे यांच्या वतीने दूध उत्पादक शेतकऱ्यांना गणेश चतुर्थी निमित्त पाच लिटर गोडेतेल भेट म्हणून देण्यात आले. गेली पाच वर्ष सदर संस्था शेतकऱ्यांना अशा प्रकारच्या भेटवस्तू देत आहे ,तसेच दिवाळीलाही बोनस दिला जातो.
यावेळी सुमारे 80 शेतकऱ्यांना भेटवस्तू देण्यात आल्या. संस्थेच्या अध्यक्षा सौ .अलका विश्वास साठे उपाध्यक्ष सौ.पूजा पांडुरंग ठाकूर सचिव सौ. तन्वी यशवंत हिंदळेकर व संस्थेचे सर्व सदस्य उपस्थित होते. सर्व शेतकऱ्यांनी संस्थेचे आभार मानले

