चिवला बीच बंद हायमास्ट बाबत नागरिकांसोबत माजी नगरसेवक यतीन खोत व सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा खोत यांनी व्यक्त केली होती नाराजी
मालवण : मालवण पालिका प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे चिवला बीच मार्गांवर दीड दिवसांच्या गणपती बाप्पांचे भाविकांना अंधारात विसर्जन करावे लागले. पालिकेच्या हायमास्ट टॉवरची दुरुस्ती वेळेत पुर्ण न केल्याने ही वेळ उद्भवली . याबाबत गणेश भक्तांनी संताप व्यक्त केला होता.
तर पालिलेला वारंवार सांगूनही वेळेत हायमास्ट टॉवर दुरुस्त झाले नाहीत. हायमास्ट खाली काढलेल्या स्थितीतच होते. असे सांगत माजी नगरसेवक यतीन खोत व सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा खोत यांनीही पालिका प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
याची दखल पालिका प्रशासनाने घेत तात्काळ हायमास्ट दुरुस्ती पुर्ण केली. हायमास्ट कार्यान्वित झाला आहे. याबाबत माजी नगरसेवक यतीन खोत व सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा खोत यांनी समाधान व्यक्त केले.
मात्र जनतेला समस्या निर्माण होता नये. पालिकेने सेवा सुविधा वेळेत पुर्ण केल्या पाहिजेत. नागरिक, लोकप्रतिनिधी यांनी वारंवार सांगून त्या नंतर काम होणे ही बाब योग्य नाही. त्वरित काम काम झाले पाहिजे. पालिका प्रशासनाची ती जबाबदारी आहे. असे नागरिकांनी या निमित्ताने सांगितले.

