Tuesday, 27 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

ओझर विद्यामंदिर, कांदळगाव येथे अद्ययावत संगणक कक्षाचे उद्घाटन

मालवण : मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण साहाय्यक समिती मुंबई संचालित,ओझर विद्यामंदिर कांदळगाव, तालुका मालवण या प्रशालेमध्ये नव्यानेच तयार करण्यात आलेल्या अद्ययावत संगणक कक्षाचे उद्घाटन, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा ओझर विद्यामंदिरचे माजी विद्यार्थी डॉ. सुहास पेडणेकर यांच्या शुभहस्ते नुकतेच करण्यात आले.


शाळेतील विद्यार्थी, पालक व शिक्षकांकडून शाळेत ऑनलाइन संगणक शिक्षण सुरू करण्याबाबत प्रयत्न करण्याची संस्थेकडे मागणी करण्यात आलेली होती. त्याचप्रमाणे माजी विद्यार्थी आणि मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू मा.डॉ. सुहास पेडणेकर यांच्याकडे सुद्धा शाळेतील सर्व शिक्षकांनी मुलांना ऑनलाइन संगणक शिक्षण सुरु करण्याची विनंती केली होती. त्यानुसार मा . डॉ. सुहास पेडणेकर यांनी अल्पावधीतच मुंबई येथील रोटरी क्लब, मुलुंड यांच्यावतीने पाच नवीन संगणक व मुंबई येथील त्यांचे मित्र श्री. मुकेश केनिया यांच्याकडून पाच नवीन संगणक संच असे एकूण दहा संगणक संच उपलब्ध करून दिले. हे संगणक संच सुस्थितीत राहण्यासाठी नवीन संगणक कक्षाची उभारणी श्रीमती निलम अनिल शेलटकर यांच्या सौजन्याने, शालेय समितीचे सदस्य श्री. विजय शेलटकर यांच्या प्रयत्नाने करण्यात आली. नवीन संगणक संच व नवीन कक्ष यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना उत्कृष्ट अशा प्रकारचे ऑनलाइन संगणक शिक्षण मिळणार आहे. सदर सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल डॉ. सुहास पेडणेकर, श्रीमती नीलम अनिल शेलटकर त्याचप्रमाणे श्री. विजय शेलटकर यांचे ओझर विद्यामंदिर परिवारातर्फे आभार व्यक्त करण्यात आले.


या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर शाळेचे माजी विद्यार्थी तथा सिंधुदुर्ग जिल्हा समाज कल्याण विभागाचे माजी साहाय्यक आयुक्त मा. श्री. शामसुंदर पेडणेकर, माजी विद्यार्थी श्री. मंगेश वायंगणकर, सुरेश भोजने, शालेय समिती अध्यक्ष श्री. किशोर नरे, सदस्य श्री. विजय शेलटकर, श्री. विजय कांबळी, श्री जयराम कांबळी, श्री. विशाल राणे, प्रभारी मुख्याध्यापक डी. डी. जाधव, शिक्षक अभय शेर्लेकर , एन. एस परुळेकर, शिवराम सावंत, श्रीमती पवार मॅडम, सर्व शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी, पालक,माजी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक प्रवीण पारकर यांनी,तर आभार प्रदर्शन शिक्षक पी. के. राणे यांनी केले.

ruchira top