माजी नगरसेवक यतीन खोत व सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा खोत यांनीही व्यक्त केली तीव्र नाराजी
मालवण : दीड दिवसांच्या सेवे नंतर गणपती बाप्पां विसर्जनास निघाले. मात्र मालवण पालिका प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे चिवला बीच मार्गांवर सायंकाळी उशिरा अंधारात बाप्पांचे विसर्जन भाविकांना करावे लागले. पालिकेच्या हायमास्ट टॉवरची दुरुस्ती वेळेत पुर्ण न केल्याने ही वेळ उदभवली. याबाबत गणेश भक्तांनी संताप व्यक्त केला. तर पालिलेला वारंवार सांगूनही वेळेत हायमास्ट टॉवर दुरुस्त झाले नाहीत. हायमास्ट खाली काढलेल्या स्थितीतच होते. असे सांगत माजी नगरसेवक यतीन खोत व सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा खोत यांनीही पालिका प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली.


