मालवण : गणराया आले आणि दीड दिवसांची सेवा घेवून निघालेही. शनिवारी गणपती बाप्पांचे आगमन झाल्यानंतर रविवारी दीड दिवसांच्या बाप्पांचे विसर्जन करण्यात आले.

कोकणात मोठ्या उत्साहात साजरा होत असलेल्या गणेश उत्सवात बाप्पांचा मान घरोघर दीड दिवस, पाच दिवस, गौरी गणपती, सात दिवस, नऊ दिवस, अकरा दिवस, अनंत चतुर्दशी असा असतो. तसेच काही घरी व मंदिर ठिकाणी पुढील काही दिवस परंपरे बाप्पांचा मुक्काम असतो.
रविवारी मालवणात दीड दिवसांच्या बाप्पांचे विसर्जन भक्तिमय वातावरणात करण्यात आले. सायंकाळी चार नंतर बाप्पा निघाले. ग्रामपंचायत, नगरपरिषद मार्फत विसर्जन मार्गांवर आवश्यक सुविधा देण्याचा प्रयत्न केला. तसेच विसर्जन मार्गांवर पोलिस प्रशासनाच्या वतीने बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

